घरताज्या घडामोडीIndia Corona Update: दिलासादायक! १४० दिवसांनंतर देशातील सक्रीय रुग्णांची संख्या सर्वाधिक कमी

India Corona Update: दिलासादायक! १४० दिवसांनंतर देशातील सक्रीय रुग्णांची संख्या सर्वाधिक कमी

Subscribe

देशात आता कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रीय रुग्णांचा आलेख आता उतरताना दिसत आहे. देशात १४० दिवसांनंतर सर्वाधिक कमी सक्रीय रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या देशात ३ लाख ८६ हजार ३५१ कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत देशात ३८ हजार ३५३ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ४९७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी २० लाख ३६ हजार ५११वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख २९ हजार १७९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आता एकूण १.२१ टक्के सक्रीय प्रकरणे आहेत, जे मार्च २०२० नंतर सर्वाधिक कमी सक्रीय रुग्ण आहेत. २४ तासांत २ हजार १५७ सक्रीय प्रकरणात कमी झाली आहे.

- Advertisement -

देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४५ टक्के झाले आहे. आयसीएमआरच्या माहितीनुसार, मंगळवारपर्यंत भारतात ४८ कोटी ५० लाख ५६ हजार ५०७ नमुन्यांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यामधील १७ लाख ७७ हजार ९६२ नमुन्यांच्या चाचण्या काल दिवसभरात झाल्या होत्या.

केंद्रीय मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत ५१ कोटी ८५ लाख १७ हजार १४८ जणांचा लसीकरण झाले आहे. यापैकी ३७ लाख ७६ हजार ७६५ जणांचे लसीकरण काल दिवसभरात झाले. दरम्यान केंद्र सरकारकडून आतापर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ५३ कोटी २४ लाख ४४ हजार ९६० लसीचे डोस उपलब्ध करून दिले आहेत. आताही राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयाजवळ २ कोटी २५ लाख ३ हजार ९०० लसीचे डोस उपलब्ध आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – केरळने वाढवलं देशाचं टेन्शन; देशातील ५१.५१ टक्के कोरोनाबाधित रुग्ण केरळमध्ये


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -