घरCORONA UPDATEIndia Corona Update : देशातील कोरोना रुग्णसंख्या आज पुन्हा घटली; 6,561 नवे...

India Corona Update : देशातील कोरोना रुग्णसंख्या आज पुन्हा घटली; 6,561 नवे रुग्ण, 142 मृत्यू

Subscribe

देशातील कोरोना रुग्णसंख्येत आज पुन्हा घट झाली आहे. काल 7500 पार गेलेली रुग्णसंख्या आज पुन्हा 6500 वर येऊन पोहचली आहे. तर 200 पार गेलेली मृतांची संख्या आज पुन्हा 142 आली आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 6,561 नवे रुग्ण आढळले आहेत, तर 142 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी 14,947 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. त्यामुळे कालच्या तुलनेत आज कोरोना रुग्णसंख्या आणि मृतांची संख्या घटली आहे. तर बरे होणाऱ्या रुगांचे प्रमाणही वाढले आहे.

कोरोनाच्या नवीन रुग्णांसोबतच मृतांच्या संख्येतही घट झाली आहे. गेल्या 24 तासात 142 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याच वेळी बुधवारी 223 जणांना आपला जीव गमवावा लागला. या दरम्यान 14,947 रुग्ण कोरोनापासून बरेही झाले आहेत.

- Advertisement -

देशात कोरोनाचे सक्रिय रुग्णही झपाट्याने कमी होत आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या आता 77,152 वर आली आहे. आत्तापर्यंत देशात कोरोनाचे 4,29,45,160 रुग्ण आढळले आहेत. तर एकूण 4,23,53,620 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्याच कोरोनामुळे 5,14,388 मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाचे सक्रिय रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहेत. देशात आता 77,152 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

- Advertisement -

देशातील एकूण कोरोनास्थिती 

देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्या: 4,29,45,160

कोरोनाचे सक्रिय रुग्ण : 77,152

देशातील कोरोनातून बरे झालेले रुग्ण : ४,२३,५३,६२०

देशातील कोरोना मृत्यू : 5,14,388

एकूण लसीकरण: 1,78,02,63,222


विरोधकांची आदळआपट म्हणजे वादळ नाही, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -