India Corona Update : देशात आज 70 हजारांपेक्षा कमी रुग्ण, मात्र मृतांचा आकडा 1 हजार पार

यामुळे भारतातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा हा 4 कोटी 23 लाख 39 हजार 611 झाली आहे. तर आत्तापर्यंत 5 लाख 4 हजार 62 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

India Corona Update covid 19 updates india registers less than 70000 daily covid cases and 1188 corona death
India Corona Update : देशात आज 70 हजारांपेक्षा कमी रुग्ण, मात्र मृतांचा आकडा 1 हजार पार

देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट ओसरत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून लाखांचा आकडा पार करणारी कोरोना रुग्णसंख्या आता हजारांपर्यंत घसरली आहे. मात्र मृतांची संख्या अजूनही भयावह आहे. गेल्या 24 तासांत भारतात 67,597 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर 1,188 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 1,80,456 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोनाच्या नव्या रुग्णांबद्ल सांगायचे झाल्यास कालच्या तुलनेत आजची रुग्णसंख्या 19.4 टक्क्यांनी कमी झाली आहे. तर कोरोना रिकव्हरी रेट सध्या 96.46 टक्क्यांवर पोहचला आहे.

देशातील केरळ या राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण नोंदवले जात आहे. या राज्यात सध्या 22,524 नवीन रुग्ण आढळले आहे. यापोठापाठ महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या मोजली जाते. महाराष्ट्र सध्या (6,436), यानंतर कर्नाटक (6,151), तामिळनाडू (5,104), मध्य प्रदेश (3,945) रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णांपैकी 65.53 टक्के रुग्ण केवळ या राज्यांमध्ये आहेत. तर 33.32 टक्के रुग्ण एकट्या केरळमध्ये आहेत.

यामुळे भारतातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा हा 4 कोटी 23 लाख 39 हजार 611 झाली आहे. तर आत्तापर्यंत 5 लाख 4 हजार 62 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या आकडेवारीनुसार, भारतात सोमवारी कोरोनाच्या 13,46,534 नमुन्यांची चाचण्या करण्यात आली, कालपर्यंत एकूण 74,29,08,121 नमुने चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर गेल्या 24 तासांत 55 लाखांहून अधिक कोरोनाविरोधी लसींचे डोस नागरिकांना देण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत देशात 170 कोटींहून अधिक कोरोनाविरोधी लस देण्यात आल्या आहेत.

भारतातील एकूण कोरोना रुग्ण: 4,23,39,611
सक्रिय रुग्ण: 9,94,891
एकूण रिव्हवरी: 4,08,40,658
एकूण मृत्यू: 5,04,062
एकूण लसीकरण: 1,70,21,72,615