घरCORONA UPDATEIndia corona update: देशातील कोरोना मृतांची संख्या वाढली; 149 मृत्यू तर 2,528...

India corona update: देशातील कोरोना मृतांची संख्या वाढली; 149 मृत्यू तर 2,528 नवे रुग्ण

Subscribe

जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढत असले तरी भारतात मात्र रुग्णसंख्या आता आटोक्यात येत आहे. लाखांच्या घरात पोहचलेली भारतातील कोरोना रुग्णसंख्या आता हजारांवर पोहचली आहे. मात्र मृतांची संख्या कालच्या तुलनेत आज वाढली आहे. 100 च्या आत पोहचलेले रुग्ण आता पुन्हा 150 च्या आसपास पोहचले आहेत. केंद्रीय आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासात 2528 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर 149 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 3997 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. काल देशात 2539 रुग्ण आढळून आले होते तर 60 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे देशात कालच्या तुलनेत आज कोरोना मृतांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

- Advertisement -

देशातील कोरोनाच्या अॅटिव्ह रुग्णांची संख्या सध्या 29,181 इतकी असून अॅटिव्ह रुग्णांचा दर 0.07 टक्के झाला आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा दर 98.73 टक्के झाला आहे. देशात आत्तापर्यंत 4 कोटी 24 लाख 58 हजार 543 रुग्ण बरे झाले आहेत. देशातील कोरोना डेली पॉझिटिव्हीटी रेट हा 0.40 टक्के आहे तर वीकली पॉझिटिव्हीटी रेट 0.40 टक्केच आहे.

देशात गेल्या 24 तासात 6 लाख 33 हजार 867 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. आत्तापर्यंत देशात 78.18 कोटी कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसींचे 180.70 कोटी डोस देण्यात आले आहेत.


विजय मल्ल्याचे ‘Happy Holi’ चे ट्विट व्हायरल; ‘आधी पैसे परत कर’ युजर्सच्या कमेंट्स

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -