घरCORONA UPDATEIndia Corona Update: देशाच्या रुग्णसंख्येत घट, १ लाखांहून अधिक कोरोनामुक्त

India Corona Update: देशाच्या रुग्णसंख्येत घट, १ लाखांहून अधिक कोरोनामुक्त

Subscribe

गेल्या २४ तासात १ लाख ३२ हजार ६२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली

देशात ४ लाखांवर गेलेली कोरोना रुग्णांची संख्या आता १० हजारांहून कमी झाली आहे. त्यामुळे भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासात देशाच्या रुग्णासंख्येत कमालीची घट झाल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून बाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासात ८० हजार ८३४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल हीच संख्या ८४ हजार ३३२ इतकी नोंदवण्यात आली होती. कालच्या तुलनेत आज देशात बाधितांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे पहायला मिळत आहे. देशात आतापर्यंत नोंदवण्यात आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ही २ कोटी ९४ लाख ३९ हजार ९८९ इतकी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारताला मोठा धक्का बसला होता. आजही देशात कोरोनाची दहशत कायम आहे. मात्र रुग्णसंख्या आलेख कमी होत असल्याने नागरिकांना मोठा दिसाला मिळाला आहे. (India Corona Update: Decline the number of Positive patients in India, more than 1 lakh corona free)

देशातील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा विचार केला असता देशात गेल्या २४ तासात १ लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या २४ तासात कोरोनावर यशस्वीरित्या मात करण्याची संख्या १ लाख ३२ हजार ६२ इतकी आहे. कालच्या तुलनेत आज देशातील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. देशात आतापर्यंत २ कोटी ८० लाख ४३ हजार ४४६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

- Advertisement -


देशात बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे त्याचप्रमाणे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूमध्येही घट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासात देशात ३ हजार ३०३ रुग्णांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. काल हीच संख्या ४ हजार २ इतकी होती. देशात आतापर्यंत ३ लाख ७० हजार ३८४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. असे असले तरी देशातील अँक्टिव्ह रुग्णांची संख्या अधिक आहे. देशात सध्या १० लाख २६ हजार १५९ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे बाधितांच्या संख्या जरी होत असली तर अँक्टिव्ह रुग्णांची संख्या अधिक आहे.

आतापर्यंत संपूर्ण देशात २५ कोटी ३१ लाख ९५ हजार ४८ नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. देशात सध्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु आहे. त्याचप्रमाणे देशातील लहान मुलांच्या लसीकरणाची ट्रायल देखील सुरु करण्यात आली आहे. लवकरच देशतील लहान मुलांना देखील लसीकरण करण्यात येईल.

- Advertisement -

हेही वाचा – covid 19 Vaccine For Children: देशात ६ ते १२ वयोगटातील मुलांवर होणार लसीची चाचणी

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -