घरCORONA UPDATEIndia Corona Update: देशात बाधितांच्या संख्येत घट, तर ४,१९४ मृत्यू

India Corona Update: देशात बाधितांच्या संख्येत घट, तर ४,१९४ मृत्यू

Subscribe

गेल्या २४ तासात देशात ३ लाख ५७ हजार ६३० रुग्ण बरे होऊन सुखरुपणे घरी परतले

देशात ४ लाखांचा टप्पा गाठणारी कोरोना रुग्णसंख्या हळू हळू कमी होत असल्याचे दिसून येत आहे. देशात आजही बाधितांच्या संख्येत काहीशी घट झाली आहे. देशात गेल्या २४ तासात २ लाख ५७ हजार २९९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कालही रुग्णसंख्येत घट पहायला मिळाली होती. काल हाच आकडा २ लाख ५९ हजारांहून अधिक होता. त्याचप्रमाणे देशात गेल्या २४ तासात मृतांचा आकडाही काही प्रमाणात कमी झाला आहे. ४ हजार १९४ जणांचा देशात मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत झालेल्या मृत्यूचा आकडा २ लाख ९५ हजार ५२५ इतका आहे.


देशात रोज बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. गेल्या २४ तासात देशात ३ लाख ५७ हजार ६३० रुग्ण बरे होऊन सुखरुपणे घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत २ कोटी ३० लाख ७० हजार ३६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या कोरोनामुक्त रुग्णांपेक्षा बाधितांची संख्या अधिक आहे. देशात आतापर्यंत २ कोटी ६२ लाख ८९ हजार २९० कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. देशात सध्या २९ लाख २३ हजार ४०० अँक्टिव्ह रुग्ण आहेत.

- Advertisement -

देशात सध्या मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. देशात आतापर्यंत १९ कोटी ३३ लाख ७२ हजार ८१९ लसीकरण करण्यात आले आहे. देशातील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. संपूर्ण जगाला कोरोना काळात महत्त्वाचे सल्ले देणाऱ्या WHOने मृतांविषयी एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. WHOच्या मते जगभरातून समोर आलेल्या अधिकृत कोरोना मृतांच्या संख्येपेक्षा खरी संख्या त्यांच्या दुप्पट आहे. आतापर्यंत मृत्यूची खोटी आकडेवारी जगासमोर आणण्यात आली आहे, असा दावा WHO ने केला आहे.


हेही वाचा – Corona Crisis: कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा अधिकृत आकडेवारीपेक्षा दुप्पट,WHOची धक्कादायक माहिती

- Advertisement -

 

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -