India Corona Update : देशातील कोरोना बळींच्या संख्येत घट; रुग्णसंख्या 1 लाख 72 हजारांवर

India Corona Update India reports 172433 new COVID cases 259107 recoveries, and 1008 deaths in the last 24 hours
India Corona Update: देशात आज कोरोनाबळींचा आकडा हजारावरचं; रुग्णसंख्या 1 लाख 72 हजारांवर

भारतात कोरोना रुग्णसंख्येत मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,72,433 नवे रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 1008 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमवला आहे. तर गेल्या 24 तासांत 2,59,107 रुग्ण बरे झाले आहेत.

विशेष बाब म्हणजे 6 दिवसांनंतर भारतातील मृतांची संख्या कमी झाली आहे. बुधवारी देशात 1,733 रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. तर यापूर्वी मंगळवारी 1192 तर सोमवारी 959 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी रविवारी 893 तर शनिवारी 871 रुग्णांचा मृत्यू झाला.

रुग्णसंख्येत चढ-उतार 

आज गुरुवारी 1,72,433 नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत. तर यापूर्वी बुधवारी 1.61 रुग्ण आढळून आले होते. मंगळवारी 1.67 लाख, सोमवारी 2.09 लाख रुग्ण नोंदवले गेली. त्याच वेळी, रविवारी 2,34,281 नवे रुग्ण नोंदवले गेले. शनिवारी कोरोनाच्या 235532 रुग्णांची नोंद झाली.

भारतात आता कोरोनाचे 15,33,921 अॅटिव्ह रुग्ण आहेत. तर रिकव्हरी रेट 95.14 टक्के आहे. त्याच वेळी, देशात आतापर्यंत 4,98,983 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात लसीचे 167.87 कोटी डोस देण्यात आले आहेत.

आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3,97,70,414 झाली आहे. आतापर्यंत 73.41 कोटी कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर गेल्या 24 तासात 1008 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्याच वेळी, एकूण मृत्यूंची संख्या 498,983 वर पोहोचली आहे.