India Corona Update : देशातील कोरोना मृतांच्या संख्येत मोठी घट ; आज 58,077 नवे कोरोनाबाधित रुग्ण

गेले अनेक दिवस मृत्यूदरात सतत वाढ होताना पाहायला मिळत होती. मात्र, आज 11 फेब्रुवारीला मृत्यूदरात घट झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 58 हजार 077 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर या काळात 1 लाख 50 हजार 407 रुग्ण बरे झाले आहेत. तर,आज अनेक दिवसांच्या कालावधीनंतर मृत्यूदरात घट झाली असून, 657 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

nagpur corona test

देशात कोरोना रुग्णसंख्येत दररोज चढउतार पाहायला मिळतात. गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झालेली पाहायला मिळत आहे. याशिवाय गेले अनेक दिवस मृत्यूदरात सतत वाढ होताना पाहायला मिळत होती. मात्र, आज 11 फेब्रुवारीला मृत्यूदरात घट झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 58 हजार 077 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर या काळात 1 लाख 50 हजार 407 रुग्ण बरे झाले आहेत. तर,आज अनेक दिवसांच्या कालावधीनंतर मृत्यूदरात घट झाली असून, 657 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे आजपर्यंत मृत झालेल्या रुग्णांची संख्या 5 लाख 07 हजार 177 इतकी आहे.देशातील दैनिक पॉझिटिव्हीटी रेट आता 3.89 टक्के झाला आहे. देशात आतापर्यंत 42,536, 137 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.यात अॅटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होऊन ही संख्या 6 लाख 97 हजार 802 इतकी झाली आहे. आतापर्यंत देशात 1,71,79,51,432 इतक्या नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

महाराष्ट्रात गुरुवारी कोरोना विषाणूच्या संसर्गाची 6248 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, जी आदल्या दिवसाच्या तुलनेत 894 कमी आहेत. यानंतर राज्यातील एकूण बाधितांची संख्या 78,29,633 झाली आहे. आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आरोग्य विभागाने सांगितले की, राज्यात व्हायरसमुळे आणखी 45 लोकांचा मृत्यू झाला, त्यानंतर मृतांची संख्या 1,43,292 झाली आहे. बुधवारी राज्यात ९२ जणांचा मृत्यू झाला होता.


हे ही वाचा – UP Election 2022 : यूपीत भाजपकडून ताकद पणाला; बरेलीत आज पीएम मोदी, गृहमंत्री अन् सीएमची रॅली