Live Update: सरकारच्या प्रस्तावावर चर्चा करणार – सदाभाऊ खोत

live update
लाईव्ह अपडेट

आजची रात्र आम्ही आझाद मैदानावर घालवणार असून सरकारच्या प्रस्तावावर चर्चा करणार असल्याचं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं आहे.


एसटी कर्मचाऱ्यांना नवीन पगारवाढ नोव्हेंबरपासूनच सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत देिली आहे.


एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत संध्याकाळी ६ वाजता मोठी घोषणा होण्याची शक्यता


अनिल परब आणि एसटी कर्मचारी शिष्टमंडळ यांच्या बैठकीची पहिली फेरी संपली आहे. ही पहिली फेरी सकारात्मक झाल्याची माहिती समोर येत आहे.


तीन कृषी कायदे मागे घेण्याचा प्रस्ताव मोदी मंत्रिमंडळात मंजूर


विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर पोहोचले.


शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीने आज चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावला.


स्थानिक गटबाजी वाढल्यामुळे आमदार बाबाजानी दुराणी यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा जयंत पाटलांकडे दिला.


विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर दाखल झाली आहे.


देशात गेल्या २४ तासांत ९ हजार २८३ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ४३७ जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे. तर १० हजार ९४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या देशात १ लाख १८ हजार ४८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


आज सकाळी ११ वाजता परिवहनमंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळ यांच्यात बैठक होणार आहे.


अनिल परब अनधिकृत रिसॉर्ट प्रकरणी राष्ट्रीय हरित ट्रिबूनल एनजीटी येथे किरीट सोमय्यांच्या याचिकेवर उद्या, गुरुवारी सकाळी ११.३० वाजता सुनावणी होणार आहे.


अमरावतीकरांना आजपासून मोठा दिलासा मिळणार आहे. अमरावती शहरात आजपासून सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत संपूर्ण बाजारपेठ उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पण रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी हा आदेश दिला आहे.


कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकल प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढता येणार आहे. आज मध्यरात्रीपासून यूटीएस या अॅपवरून तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठीही लशीचे दोन्ही डोस बंधनकारक असणार आहे.


औरंगाबादमध्ये लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या आदेशानुसार, पहिला डोस न घेतलेल्या नागरिकांना रिक्षामध्ये प्रवास करता येणार नाही. जो रिक्षा चालक नियमांचे पालन करणार नाही, त्यांचं वाहन जप्त केलं जाणार आहे. तसेच बस तिकिटं काढताना लसीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.