Live Update: दक्षिण आफ्रिकेत आढळला कोरोनाचा सुपर व्हेरिएंट

live update
लाईव्ह अपडेट

दक्षिण आफ्रिकेत कोविड-१९चा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. त्यामुळे या देशात एकच खळबळ उडाली आहे. दक्षिण आफ्रिकेत मल्टिपल म्यूटेशनवाला कोविड व्हेरिएंट सापडला आहे


परमबीर सिंह यांची गुन्हे शाखेकडून ७ तास चौकशी करण्यात आली आहे. परंतु परमबीर सिंहांनी त्यांच्यावर असलेले सर्व आरोप खोटे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.


ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रूग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल क्लिनीकमध्ये उपचार सुरू आहेत.


राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. २२ ते २९ डिसेंबर या कालावधीत हिवाळी अधिवेशन प्रस्तावित करण्यात आलं आहे.


यंदा हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार असल्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे.


मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि पीडियाट्रिक टास्क फोर्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने १ डिसेंबरपासून ग्रामीण भागात इ.१ली ते ४थी व शहरी भागात इ.१ली ते ७ वीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.


राज्यातील पहिली ते सातवीचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळातील बैठकीत घेण्यात आला आहे.


राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत उपस्थितीत झाले आहेत.


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आज मुंबई गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. गेल्या ५ तासांपासून परमबीर सिंह यांची चौकशी सुरू आहेत.


देशात गेल्या २४ तासांत ९ हजार ११९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ३९६ जणांना मृत्यू झाला आहे. तर १० हजार २६४ जण रिकव्हर झाले आहेत. सध्या देशात १ लाख ९ हजार ९४० सक्रिय रुग्ण आहेत.


शक्ती मिल सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची मुंबई हायकोर्टाने फाशी केली रद्द


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह अखेर मुंबईत दाखल झाल्याचे समोर आले आहे. कोर्टाने काही दिवसांपूर्वी परमबीर सिंह यांना फरार घोषित केले होते. मात्र आता परमबीर सिंह मुंबईत दाखल झाले आहेत.


अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अलर्ट राहण्यास सांगितले आहे. कारण थोड्यात वेळात मलिक नवा गौप्यस्फोट करणार असल्याचे दिसत आहे.


राष्ट्रपती रामनाथ कोविंद ७ डिसेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देणार असल्याची माहिती समोर आली आहे.


दिल्ली दौऱ्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला महाराष्ट्रात ममता बॅनर्जी येणार आहेत.


दिल्लीत काल दिवसभरात ३५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून २० जण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या दिल्लीत ३११ जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच १४ लाख १५ हजार ३४८ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.


भाजप नगसेवकांची काल, बुधवारी रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर बैठक पार पडली. विधान परिषद निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठक पार पडली.


भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज निर्णय होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आज सदाभाऊ खोत पत्रकार परिषद घेणार आहेत.


शक्ती मिल सामुहिक बलात्कार प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.