Live Update: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मणक्याची यशस्वी शस्त्रक्रियेनंतर लवकरच मिळणार डिस्चार्ज

live update
लाईव्ह अपडेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मणक्यावर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटल येथे यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली असून आता ते फिजिओथेरेपीचा उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल.


मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना राज्याकडून तीन महिन्यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्राकडे देण्यात आला आहे.


आज दुपारी ३.३० वाजता डोंबिवलीतील ४ ते ५ भाजपा नगरसेवक नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नंदनवन येथे शिवसेना प्रवेश करणार आहेत.


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह भारतातच आहे, असे सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान त्यांच्या वकीलांनी सांगितले. तसेच त्यांना मुंबई पोलिसांकडून धोका असल्यामुळे ते लपून बसल्याचे परमबीर सिंहच्या वकीलांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची निवडणूक बिनविरोधी होणार असल्याचे समोर आले आहे. संजय केणेकर उमेदवारी आर्ज मागे घेणार असल्याचे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी यासंदर्भात देवेंद्र फडणवीस आणि बाळासाहेब थोरात यांच्यात बैठक झाली होती.


एसटी संपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पावर आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये खलबतं सुरू असल्याचं समोर आलं आहे.


देशात गेल्या २४ तासांत ८ हजार ४८८ नव्या कोरोनाबाधितांमध्ये वाढ झाली असून २४९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १२ हजार ५१० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या देशात १ लाख १८ हजार ४४३ रुग्णावर उपचार सुरू आहेत.


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर आज दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. परमबीर सिंह यांनी अटकेपासून संरक्षण देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. याआधी १८ नोव्हेंबरला परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी झाली होती.


पालघरमधील कुबेर शॉपिंग सेंटरमध्ये भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिकांविरोधातील अब्रुनुकसानीच्या दाव्यावरती आज मुंबई उच्च न्यायालयात निकाल लागणार आहे.


अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात आज दिवसभर अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. किनारपट्टीच्या भागात जोरदार वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. २२ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत ममता बॅनर्जी दिल्ली दौरा करणार आहेत.


कर्नाटकात मुसळधार पावसाने हाहाकार घातला आहे. एकूण २४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच ६५८ घरांच पूर्ण नुकसान झाले असून ८,४९५ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. शिवाय मुसळधार पावसाचा फटाका मुक्या जनावरांना देखील बसला आहे. १९१ प्राणी मृत झाल्याची माहिती देण्यात आली आहे.


दिल्लीतील प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. SAFAR-India नुसार दिल्लीतील हवाई गुणवत्ता निर्देशांक (AQI) सध्या ‘अत्यंत वाईट’ श्रेणीमध्ये ३५२वर आहे.


जळगाव जिल्ह्या बँकेसाठी ९४ टक्के मतदान झाले आहे. थोड्याच वेळात (सकाळी ८ वाजता) मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सहकार आणि शेतकरी विकास पॅनलमध्ये ही लढत आहे. १० जागांसाठी ३१ उमेदवार रिंगणात आहे.