Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE India Corona Update: देशात २४ तासात बाधितांच्या संख्येत काही अंशी वाढ, २,५४२...

India Corona Update: देशात २४ तासात बाधितांच्या संख्येत काही अंशी वाढ, २,५४२ जणांचा मृत्यू

देशाचा रिकव्हरी रेट ४५.८० टक्क्यावर आला आहे.

Related Story

- Advertisement -

देशातील कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू घटत आहे. बाधितांची संख्या आता ६० हजारांवर आली आहे. एकवेळी ४ लाखांच्या घरात पोहचलेली रुग्णसंख्या आता मोठ्या प्रमाणात आटोक्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासात ६२ हजार २२४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. काल हाच आकडा ६० हजारांहून अधिक होता. आज मात्र यामध्ये २ हजारांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. देशात आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या बाधितांची संख्या ही २ कोटी ९६ लाख ३३ हजार १०५ इतकी आहे. गेल्या २४ तासात देशात बाधितांच्या संख्येतही वाढ झाली आहे. (India Corona Update: Number of covid 19 Patirnts rises slightly in 24 hours, 2,542 die)

देशातील मृतांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे. देशात गेल्या २४ तासात २ हजार ५४२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. आज ही संख्या कमी झालीय. काल हाच आकडा २ हजार ७२६ इतका होता. देशात आतापर्यंत ३ लाख ७९ हजार ५७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. देशाचा रिकव्हरी रेट ४५.८० टक्क्यावर आला आहे. गेल्या आठवड्याभरात देशातील पॉझिटिव्हीटी रेड ५ टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले आहे. तर देशात गेल्या २४ तासात २८ लाख ४५८ लोकांचे लसीकरण केल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -

देशात गेल्या २४ तासात १ लाख ७ हजार ६२८ रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. कालच्या तुलनेत आज कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पहायला मिळत आहे. कालच हीच संख्या १ लाख १७ हजार ५२५ इतकी होती. देशात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. देशात आतापर्यंत २ कोटी ९६ लाख ८८ हजार १०० लोकांनी कोरोनावर मात करुन ते सुखरुपणे घरी परतले आहेत.

 


- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Corona Update: राज्यात आज नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दुप्पट, तर मृत्यू ३८८

 

- Advertisement -