घरCORONA UPDATEIndia Corona Update: देशातील बाधितांच्या संख्येत घट, २४ तासात ७३८ रुग्णांचा...

India Corona Update: देशातील बाधितांच्या संख्येत घट, २४ तासात ७३८ रुग्णांचा मृत्यू

Subscribe

देशात गेल्या २४ तासात ५७ हजार ४७७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात

देशातील कोरोनाचा कहर आता मोठ्या प्रमाणात आटोक्यात आला आहे. बाधितांच्या संख्येत मोठी घट होण्यास सुरुवात झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासात ४४ हजार १११ नव्या बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल हाच आकडा ४६ हजारांहून अधिक होता. आज बाधितांच्या संख्येत २ हजारांहून अधिक घट झाली आहे. देशात आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या बाधितांची संख्या ३ कोटी ५ लाख २ हजार ३६२ इतकी आहे. देशाचा रिकव्हरी रेटही वाढला आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना मोठा दिला मिळाला आहे. देशातील वाढलेली रुग्णसंख्या कमी होत असल्याचे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेवरील भार कमी होत आहे. (India Corona Update: number of Positiva Patients in India is decreased)


देशातील रिकव्हर होणाऱ्या रुग्णांचा विचार केला असता देशात गेल्या २४ तासात ५७ हजार ४७७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. कालच्या तुलनेत आज देशातील रिकव्हर होणाऱ्या रुग्णांमध्ये २ हजारांनी घट झाली असली तरी आता पर्यंत देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या २ कोटी ९६ लाख ५ हजार ७७९ इतकी आहे. देशाचा रिकव्हरी रेट वाढला असला तरी देशात अँक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. देशात सध्या ४ लाख ९५ हजार ५३३ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नसून नागरिकांना आणखी काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

- Advertisement -

कोरोनामुळे होणारे मृत्यू देखील कमी झाले आहेत. देशात आज ७३८ रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. (738 patients died in 24 hours)  देशातील मृतांचा आकडा फार जलद गतीने कमी झाल्याचे पहायला मिळाले आहे.  देशात आतापर्यंत ४ लाख १ हजार ५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी देशात लसीकरण मोहिम सुरु आहे. देशात आतापर्यंत ३४ कोटी ४६ लाख ११ हजार २९१ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. देशात सध्या कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड आणि स्पुतनिक व्हि अशा तीन लसी देण्यात येत आहेत.


हेही वाचा – Maharashtra Corona Update: दिलासादायक! राज्यात २४ तासांत नव्या रुग्णसंख्येत आणि मृत्यूच्या संख्येत घट

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -