Live Update : कॅप्टन वरुण सिंह यांचे पार्थिव भोपाळमध्ये दाखल

Live Update

कॅप्टन वरुण सिंह यांचे पार्थिव भोपाळमध्ये दाखल


महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला अखेर सुप्रीम कोर्टाची परवानगी


लखीमपूर हत्याकांडावरून लोकसभेत विरोधकांचा गोंधळ, अजय मिश्रांच्या राजीनाम्याची मागणी, लोकसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित


राज्य मागासवर्ग आयोगाची आज पुण्यात बैठक, ओबीसींच्या इम्पिरिकल डेटासंदर्भात काय निर्णय होणार?


पुणे शहरातील शाळा आजपासून इयत्ता १ ते ७ वीच्या शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे तब्बल दीड वर्षांनी शाळांमध्ये लहान मुलांचा किलबिलाट ऐकायला मिळणार आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूमुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आता मात्र शाळा सुरु करण्यात येत आहेत. त्यामुळे शाळा प्रशासनाकडून यासाठी खास तयारी केली जात आहे.