घरCORONA UPDATEIndia Corona Update : देशभरात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत 13 टक्क्यांनी घट ; मृत्यू...

India Corona Update : देशभरात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत 13 टक्क्यांनी घट ; मृत्यू दरात वाढ

Subscribe

कोरोनाच्या रुग्णसंख्येत दररोज चढउतार पाहायला मिळतात. आज देशभरात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. दिवसभरात 1 लाख 49 हजार 394 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.याशिवाय, देशात सक्रिय प्रकरणांची संख्या 15 लाखांपेक्षा कमी झाली आहे.

कोरोनाच्या रुग्णसंख्येत दररोज चढउतार पाहायला मिळत आहेत. आज देशभरात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. दिवसभरात 1 लाख 49 हजार 394 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.याशिवाय, देशात सक्रिय प्रकरणांची संख्या 15 लाखांपेक्षा कमी झाली आहे. सध्या भारतात 14 लाख 35 हजार 569 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात 2 लाख 46 हजार 674 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत, त्यानंतर एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4 लाख 17 हजार 88 झाली आहे. सध्या देशात रिकव्हरी रेट 95. 39 टक्के आहे. याशिवाय, दैनंदिन संक्रमण देखील 10 टक्क्यांवरून 9.27 टक्क्यांपर्यंत नोंदवला गेला आहे.

 

- Advertisement -

भारतात आतापर्यंत एकूण 4,19,52,712 लोकांना संसर्ग झाला आहे. त्याचवेळी, भारतात कोविडमुळे मृतांची संख्या पाच लाखांच्या वर गेली आहे. आतापर्यंत एकूण 5,00,055 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 1 हजार 72 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

गेल्या २४ तासांत कोरोना लसीचे ५५,५८,७६० डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण 1,68,47,16,068 डोस देण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी भारतातील मृतांची संख्या कमी झाली होती. मात्र, आज मृत्यू दरात वाढ होताना पाहायला मिळत आहे.


हे ही वाचा – Attack On Owaisi : हिंदूंविरोधी वक्तव्यामुळे ओवैसींवर गोळीबार केला, पोलीस चौकशीत आरोपीचा जबाब


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -