घरCORONA UPDATEIndia Corona Update: देशात २४ तासात रुग्णसंख्येत घट, ३ हजारांहून अधिक मृत्यू

India Corona Update: देशात २४ तासात रुग्णसंख्येत घट, ३ हजारांहून अधिक मृत्यू

Subscribe

२४ तासात देशात ३ लाख ६६ हजार १६१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

देशात कोरोनाचा हाहा:कार सुरुच आहे. काल देशातील रुग्णसंख्येने ४ लाखांचा टप्पा पार केला. मे महिन्यात देशातील रुग्णसंख्या ४ लाखांहून अधिक नोंदविण्यात येईल असे अंदाज आधीच व्यक्त केले जात होते. कालच्या तुलनेत आज देशाच्या बाधित रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट झाली आहे. गेल्या २४ तासात देशात ३ लाख ६६ हजार १६१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. काल हिच संख्या ४ लाख इतकी होती. ४ लाखांच्या विक्रमी नोंद काल देशात करण्यात आली. गेल्या २४ तासात देशात झालेल्या मृत्यूंची संख्याही कमी झाल्याचे दिसून येत आहे. आज देशात ३ हजार ७५४ जणांनी कोरोनामुळे प्राम गमावले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या २ लाख ४६ हजार २३७ इतकी आहे.


देशातील बाधितांची व कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या पाहिली असता आजच्या तुलनेत काल अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. गेल्या २४ तासात देशात ३ लाख ५३ हजार ८१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत १ कोटी ८६ लाख ७१ हजार २२२ रुग्ण कोरोनामुत्च झाले आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यत देशात नोंद करण्यात आलेल्या बाधित रुग्णांची संख्या २ कोटी २६ लाख ६२ हजार ५७५ इतकी आहे.

- Advertisement -

देशात १ मे पासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु करण्यात आला आहे. तिसऱ्या टप्प्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण केले जात आहे. देशात आतापर्यंत १७ कोटी १ लाख ७६ हजार ६०३ नागरिकांचे लसीकरण करुन पूर्ण झाले आहे. देशात इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले असले तरी देशातील रुग्णांचा आकडा ४ लाखांच्या पार गेल्याचे आपण पाहत आहोत. कोरोनाच्या भयानक परिस्थितीवर इंडिया मेडिकल असोसिएशनने (IMA – Indian Medical Association) देशात संपूर्ण लॉकडाऊनची मागणी केली आहे. झोपेतून जागे व्हा! कोरोनामुळे निर्माण झालेल्या भयानक परिस्थितीशी लढण्यासाठी काही कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे IMA ने म्हटले आहे.


हेही वाचा – २०१५ पासून चीनची कोरोना विषाणूच्या निर्मितीची तयार सुरू, ‘द वीकेंड ऑस्ट्रेलियन’चा दावा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -