India Corona Update: देशात कोरोनासह ओमिक्रॉनचं संकट वाढलं! २४ तासांत ३,४७,२५४ नव्या रुग्णांची भर, ७०३ जणांचा मृत्यू

देशात ४.३६ टक्क्यांनी ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत देशात ९ हजार ६९१ ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत.

maharashtra corona update patients 222 discharged today 149 new cases in the state today
Corona Update : राज्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक; 149 नवे रुग्ण, 222 कोरोनामुक्त

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा वेग वाढला आहे. काल, गुरुवारपासून देशात ३ लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. आजही ३ लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच ओमिक्रॉनच्या रुग्ण वाढीचा दर देखील वाढला आहे. काल देशात ३ लाख १७ हजार ५३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. आज यामध्ये २९ हजार ७२२ रुग्णांची भर पडून ३ लाख ४७ हजार २५४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशात दिवसेंदिवस चिंता वाढताना दिसत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ७०३ रुग्णांचा मृत्यू झाला असून २ लाख ५१ हजार ७७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. देशात दैनंदिन कोरोना पॉझिटिव्हीट दर आता १७.९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या देशात २० लाख १८ हजार ८२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुसऱ्या बाजूला देशात ४.३६ टक्क्यांनी ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत देशात ९ हजार ६९१ ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या – ३ कोटी ८५ लाख ६६ हजार २७
देशातील एकूण मृत्यूची संख्या – ४ लाख ८८ हजार ३९६
देशातील एकूण रुग्ण बरे झालेल्यांची संख्या – ३ कोटी ६० लाख ५८ हजार ८०६
देशातील एकूण सक्रीय रुग्णसंख्या – २० लाख १८ हजार ८२५
देशातील एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या – ९ हजार ६९१
देशातील एकूण चाचण्याची संख्या – ७१ कोटी १५ लाख ३८ हजार ९३८
देशातील एकूण लसीकरणाची संख्या – १ अब्ज ६० कोटी ४३ लाख ७० हजार ४८४


हेही वाचा – Corona Guidelines for Childrens: ५ वर्षांच्या मुलांना मास्कची सक्ती नाही! एंटीव्हायरल वापरासाठी केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स जाहीर