Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश देशात कोरोनाचं थैमान सुरूच! २४ तासांत ८९ हजारांहून अधिक बाधितांची नोंद

देशात कोरोनाचं थैमान सुरूच! २४ तासांत ८९ हजारांहून अधिक बाधितांची नोंद

Related Story

- Advertisement -

जगभरासह देशात कोरोना रूग्णाचा वाढता आकडा आता चिंतेचा विषय ठरत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा वेग सातत्याने वाढता असल्याने देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट य़ेण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. दरम्यान देशात गेल्या २४ तासांत शुक्रवार पेक्षा अधिक रूग्ण आढळले आहेत. शनिवारी आज एका दिवसात ८९ हजार १२९ नवे कोरोनाबाधित रुग्णांनी नोंद करण्यात आली आहे. तर ७१४ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

- Advertisement -

यासह दिलासादायक बाब म्हणजे ४४ हजार २०२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून ते कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आता देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी २३ लाख ९२ हजार २६० वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ६४ हजार ११० जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी १५ लाख ६९ हजार २४१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ६ लाख ५८ हजार ९०९ इतके सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या सोबतच कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहवा यासाठी देशभरात कोरोना लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरू असून सध्या देशात १ एप्रिलपासून ४५ वर्ष आणि त्यावरील नागरिकांना कोरोना लस देण्यात येत आहे. तर आतापर्यंत ७ कोटी ३० लाख ५४ हजार २९५ जणांचे कोरोना लसीकरण पार पडले आहे.

तसेच २ एप्रिलपर्यंत देशभरात २४ कोटी ६९ लाख ५९ हजार १९२ नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी आतापर्यंत १० लाख ४६ हजार ६०५ नमुन्यांच्या चाचण्या शुक्रवारी दिवसभरात करण्यात आल्या, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.

- Advertisement -

- Advertisement -