घरCORONA UPDATEदेशात कोरोनाबाधितांचा आकडा ७ लाख पार; २० हजारांहून अधिक मृत्यू

देशात कोरोनाबाधितांचा आकडा ७ लाख पार; २० हजारांहून अधिक मृत्यू

Subscribe

गेल्या २४ तासांत देशभरात एकूण २२ हजार २५२ कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद

देशात कोरोनाचा संसर्ग कमी होण्याऐवजी पसरत आहे. यामुळे कोरोना रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतेय. आतापर्यंत देशात कोरोनाची लागण झालेल्या बाधितांचा आकडा हा ७ लाखांच्या पुढे गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात एकूण २२ हजार २५२ कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून या रुग्णांसह देशातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा ७ लाख १९ हजार ६६५ वर पोहोचला आहे. तर एकूण कोरोना रुग्णांमध्ये २ लाख ५९ हजार ५५७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

- Advertisement -

एकूण २० हजारांहून अधिकांचा बळी

तसेच कोरोनाचे नवे रुग्ण समोर येत असताना देशात कोरोनामुळे आपला जीव गमावणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. ही संख्याही २० हजारांच्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी सकाळी ८ ते मंगळवारी सकाळी ८ पर्यंत देशभरात कोरोनामुळे ४६७ मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत देशभरात या कोरोनाने एकूण २० हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे.

रिकव्हरी रेट ६१ टक्क्यांहून अधिक

भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वाढीसह, कोरोनामधून बरे होणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत देशभरात एकूण ४ लाख ३९ हजार ९४७ हजार लोकं बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत देशभरातील १५ हजार ५१५ लोक कोरोनातून बरे झाले आहेत. देशातील कोरोनाची रिकव्हरी रेट ६१ टक्क्यांहून अधिक आहे.

- Advertisement -

कोरोना रुग्णांच्या चाचणीसाठी देशात सातत्याने चाचणी होत आहे. सोमवारी देशभरात २.४१ लाखाहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशातील एकूण कोरोनाची चाचणी वाढून १.०२ कोटींवर गेली आहे. अमेरिका, रशिया आणि ब्रिटननंतर भारतात सर्वाधिक कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.


CoronaVirus: रशियाला मागे टाकत, भारत पोहोचला तिसऱ्या क्रमांकावर!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -