घरCORONA UPDATEIndia Coronavirus: दिलासादायक! देशाच्या नव्या कोरोना रुग्णसंख्येत किचिंत घट

India Coronavirus: दिलासादायक! देशाच्या नव्या कोरोना रुग्णसंख्येत किचिंत घट

Subscribe

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे स्पष्ट होत आहे. काल (सोमवारी) देशात ६८ हजार २० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. मात्र आज देशाच्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येते किंचित घट झाली आहे. गेल्या २४ तासांत ५६ हजार २११ नव्या रुग्णांची वाढ झाली असून २७१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच ३७ हजार २८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी २० लाख ९५ हजार ८५५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ६२ हजार ११४ रुग्णांचा मृत्यू झाला असून १ कोटी १३ लाख ९३ हजार २१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ५ लाख ४९ हजार ७२० रुग्णावर उपचार सुरू आहे.

- Advertisement -

आतापर्यंत देशात ६ कोटी ११ लाख १३ हजार ३५४ जणांचे कोरोना लसीकरण पार पडले आहे. २९ मार्चपर्यंत २४ कोटी २६ लाख ५० हजार २५ नमुन्यांचे चाचण्या झाल्या आहेत. यापैकी ७ लाख ८५ हजार ८६४ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.

- Advertisement -

या देशांमध्ये सर्वाधिक रूग्ण

अमेरिका, ब्राझील, भारत या तिन्ही देशांमध्ये सर्वाधिक रुग्ण वाढ होत असून १ कोटी २० लाखांवर रुग्णसंख्या पोहोचली आहे. तर फ्रान्स, रशिया, ब्रिटन या देशांमध्ये ४० लाखांहून अधिक रुग्णांची संख्या आहे. भारत जगातील कोरोनाबाधितांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

जगातील यादीतील टॉप-५ देश

अमेरिका : एकूण रुग्ण ३१,०३३,८०१/ एकूण मृत्यू ५६३,२०६

ब्राझील : एकूण रुग्ण १२,५७७,३५४/ एकूण मृत्यू ३१४,२६८

भारत : एकूण रुग्ण १२,०९५,८५५/ एकूण मृत्यू १६२,१४७

फ्रान्स : एकूण रुग्ण ४,५५४,६८३/ एकूण मृत्यू ९४,९५६

रशिया : एकूण रुग्ण ४,३३७,६९६/ एकूण मृत्यू १२६,६१५


हेही वाचा – Maharashtra Corona Update: राज्यात कोरोना मृतांची संख्या वाढली, २४ तासात ३१ हजार ६४३ कोरोनाबाधितांची नोंद


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -