Live Update : आमच्याकडे १६६ एवढं बहुमत, विरोधी पक्ष अल्पमतात; आमचाच विजय – राम कदम

corona update maharashtra political crisis cm eknath shinde shivsena atal bihar vajpayee death aniversary

आमच्याकडे १६६ एवढं बहुमत, विरोधी पक्ष अल्पमतात; आमचाच विजय – राम कदम


शिंदे गट आणि भाजप आमदारांची ताजमध्ये बैठक सुरु


मुंबई विमानतळावरून आमदार ताज प्रेसिडंटकडे रवाना

११ दिवसानंतर शिंदे गटाचे आमदार मुंबईत दाखल

शिंदे गट गोवा विमानतळावर दाखल

गोव्याहून सर्व आमदार मुंबईसाठी रवाना


संजय राऊत उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल


महाविकास आघाडी सरकारची आज संध्याकाळी बैठक, विधानसभा अध्यक्ष निवडीवर बैठकीत होणार चर्चा


संभाजीराजे छत्रपती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला


विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी सरकारकडून आमदार राजन साळवी यांनी भरला उमेदवारी अर्ज


मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी शिंदेंच्या खांद्यावर बंदूक – संजय राऊत

जिथे ठाकरे तिथे शिवसेना – संजय राऊत

शिवसेनेत आमदार आणि खासदार निवडून आणण्याची ताकद – संजय राऊत

शिवसैनिक मोहाला बळी पडणारे नाहीत

बुडबुडे होते ते फुटले, राऊतांचा बंडखोर आमदारांवर निशाणा


गोव्यात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बंडखोर आमदारांची बैठक


बंडखोर आमदार आज गोव्याहून मुंबईत परतणार

सध्या गोव्यात मुक्कामी असलेले शिंदे समर्थक आमदार आज गोव्याहून मुंबईत परतणार आहेत. ३ आणि ४ जुलैला होणाऱ्या विशेष अधिवेशनासाठी हे आमदार मुंबईत येणार आहे. या अधिवेशनात बहुमत चाचणी होणार आहे. मुंबईतील ऑबेरॉय हॉटेलमध्ये हे आमदार राहणार आहेत.


विधानसक्षा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस

विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला असून महाविकास आघाडी आज त्यांचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.


कोकणात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईला ऑरेंज अलर्ट


एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी

पक्षाविरोधात बंडखोरी करत भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आता पक्षाने मोठी कारवाई केली आहे. एकनाथ शिंदे यांना पक्षनेते पदावरून काढून टाकण्यात आले आहे.