India Coronavirus Update : देशातील कोरोना रुग्णसंख्या 1 हजारावर; 24 तासात 1233 नवे रुग्ण, 31 मृत्यू

India Coronavirus Update india reports 1,233 new Covid cases and 33 death in the last 24 hours
India Coronavirus Update : देशातील कोरोना रुग्णसंख्या 1 हजारावर; 24 तासात 1233 नवे रुग्ण, 31 मृत्यू

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी लाखोंच्या घरात पोहचलेली रुग्णसंख्या आता एक हजारांच्या आपसाप पोहचली आहे. देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1233 नवे रुग्ण आढळून आले आहे, तर 31 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय देशात आता 14,704 अॅटिव्ह रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 31 रुग्णांमुळे मृतांची संख्या 521,101 वर पोहचली आहे. तर गेल्या 24 तासात 1800 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त होत घरी परतले आहेत. यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या 42,487,410 वर पोहचली आहे. देशात आत्तापर्यंत कोरोनाचे 43,023,215 रुग्ण आढळून आले आहेत.

देशातील कोरोनाविरोधी लसीकरण मोहितेअंतर्गत गेल्या 24 तासात देशात 26,34,080 लसीचे डोस देण्यात आले. आत्तापर्यंत लसीचे 1,83,82,41,743 डोस देण्यात आले आहेत. भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या सातत्याने घसरत आहे.


हेही वाचा : श्रीनगर चकमकीत दोन दहशतवादी ठार; दहशतवादी रईस ऑनलाइन पोर्टलचा माजी संपादक