India Coronavirus Update : देशातील कोरोना रुग्णसंख्या 10.0 टक्क्यांनी घटली, 1270 नवे रुग्ण, 31 मृत्यू

India Coronavirus Update today 1270 new covid cases 31 death in last 24 hour
India Coronavirus Update : देशातील कोरोना रुग्णसंख्या 10.0 टक्क्यांनी घटली, 1270 नवे रुग्ण, 31 मृत्यू

जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे महामारीचा धोका व्यक्त केला जात आहे. मात्र भारतात कोरोना रुग्णसंख्या सातत्याने घटत असल्याचे दिसतेय. गेल्या 24 तासात देशात 1270 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 31 रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. तर अॅटिव्ह रुग्णांची संख्या 15,859 वर पोहचली आहे. काल हीच संख्या 1421 होती. तर 149 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासात 1567 रुग्ण कोरोनातून बर होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 4 कोटी 24 लाख 83 हजार 829 इतकी झाली आहे. तर आत्तापर्यंत कोरोनामुळे देशात 5 लाख 21 हजार 35 लोकांनी आपला जीव गमावला आहे. कर

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात आत्तापर्यंत 13 कोटीहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहे. तर गेल्या 24 तासात 4 लाख 20 हजार 842 लसीचे डोस देण्यात आले. यामुळे एकूण लसीकरणाची संख्या 183 कोटी 26 लाख 35 हजार 673 झाली आहे. दरम्यान देशात आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांवरील नागरिकांना 2 कोटी 25 लाख 80 हजार 52 लस देण्यात आल्या आहेत.


Russia – Ukraine War: युक्रेन रशियाशी आता तह करण्यास तयार; झेलेन्स्की म्हणाले, नाटोच्या मैत्रीची गरज नाही