Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE India Covid-19 Update: चिंताजनक! महाराष्ट्रासह 'या' आठ राज्यात एक लाखांहून अधिक रुग्ण...

India Covid-19 Update: चिंताजनक! महाराष्ट्रासह ‘या’ आठ राज्यात एक लाखांहून अधिक रुग्ण सक्रिय

Related Story

- Advertisement -

देशात दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज साडे तीन लाखांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. जगात आतापर्यंत एका दिवसात कुठेही इतक्या कोरोनाबाधितांची नोंद झाली नाही आहे. यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाशी लढण्यासाठी सातत्याने बैठका घेत आहेत. यादरम्यान आज देशात तीन लाख ५२ हजार ९९१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर सध्या देशात २८ लाख १२ हजार ६५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, राजस्थान, छत्तीसगढ, गुजरात आणि तामिळनाडू असे राज्य आहेत, जिथे एक लाखांहून अधिक रुग्ण सक्रिय आहेत. शिवाय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, आतापर्यंत १४.१९ कोटी लसीकरण पार पडले आहे.

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, ‘सध्या देशात ८२ टक्के कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. जवळपास १६.२५ टक्के म्हणजेच २८ लाख १३ हजार ६५८ रुग्ण सक्रिय आहेत. काही राज्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या अधिक आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, राजस्थान, छत्तीसगढ, गुजरात आणि तामिळनाडू यांचा समावेश आहे. दरम्यान आतापर्यंत १४ कोटी १९ लाख कोरोना लसीकरण पार पडले आहे.’

- Advertisement -

ऑक्सिजन तुटवड्याबाबत लव अग्रवाल म्हणाले की, ‘सध्या देश परदेशातून ऑक्सिजनचे टँकर खरेदी आणि भाडे तत्वावर घेत आहेत. ऑक्सिजन टँकरची वाहतूक हे एक मोठे आव्हान आहे. रियल टाइम ट्रॅकिंगचा उपयोग करत, आम्ही ऑक्सिजन टँकरच्या हालचालींवर नजर ठेवत आहोत.’


हेही वाचा – Maharashtra Lockdown 2021: १ मे नंतर कडक निर्बंधांचा कालावधी वाढणार? महापालिका आयुक्तांचा मोठा खुलासा


- Advertisement -