शिंजो आबे यांना नरेंद्र मोदींसह अनेकांनी वाहिली श्रद्धांजली, भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे भारतासोबत घनिष्ट संबंध होते. भारतात अनेक सरकारे बदलली मात्र शिंजो आबे यांचं भारतासोबतचे नाते बदलले नाही. तसेच, ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चांगले मित्र होते. त्यामुळे शिंजो आबे यांच्या निधनानंतर नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Japan Former PM Shinzo Abe) यांचे आज निधन झाले. म्हणून, भारतात उद्या एक दिवसीय राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे भारतासोबत घनिष्ट संबंध होते. भारतात अनेक सरकारे बदलली मात्र शिंजो आबे यांचं भारतासोबतचे नाते बदलले नाही. तसेच, ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चांगले मित्र होते. त्यामुळे शिंजो आबे यांच्या निधनानंतर नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. (India declares national mourning over Shinzo Abe’s death)


नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शिंजो आबे यांच्याप्रती शोक व्यक्त केला आहे. माझ्या सर्वात प्रिय मित्रांपैकी एक शिंजो आबे यांच्या दुःखद निधनाने मला धक्का बसला आहे. ते एक जागतिक राजकारणी, एक उत्कृष्ट नेता आणि एक उल्लेखनीय प्रशासक होते. जपान आणि जगाला घडवण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


शिंजो आबे यांच्यावर आज सकाळीच गोळीबार झाला. भाषणादरम्यान ते अचानक खाली कोसळले तेव्हा तेथील उपस्थित जमावाला गोळीबाराचा आवाज आला. ते खाली कोसळले तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात होते. त्यामुळे त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनीही ट्विटरद्वारे शोक व्यक्त केला आहे. शिंजो आबे यांच्या निधनाने मला दुःख झाले आहे. भारत आणि जपान यांच्यातील नातेसंबंध दृढ करण्याकरता त्यांचे भरीव योगदान आहे.

यांच्यासह अनेकांनी आबे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून दुःख व्यक्त केलं आहे.