घर देश-विदेश न्यूयॉर्क टाइम्सकडून भारताच्या बदनामीची मोहीम; अनुराग ठाकूर यांचा मोठा आरोप

न्यूयॉर्क टाइम्सकडून भारताच्या बदनामीची मोहीम; अनुराग ठाकूर यांचा मोठा आरोप

Subscribe

नवी दिल्ली : न्यूयॉर्क टाइम्सचे अध्यक्ष ए.जी. सुल्झबर्गर यांनी आरोप केला आहे की, भारतातील पत्रकारांना दहशतवाद्यांप्रमाणे वागवले जाते. या आरोपाला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी गुरुवारी (4 मे) उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, जगातील काही जुने मीडिया हाऊस भारताविरुद्ध पद्धतशीरपणे चुकीची माहिती देणारी मोहीम चालवत आहेत.

बुधवारी जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या (UNESCO) कार्यक्रमात न्यूयॉर्क टाइम्सचे अध्यक्ष ए.जी. सुल्झबर्गर सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी बोलताना आरोप केला की, भारतातील अधिकाऱ्यांनी न्यूजरूमवर छापे टाकले आहेत आणि पत्रकारांना दहशतवादी मानले आहे. या आरोपाला उत्तर देताना अनुराग ठाकूर ट्वीट केले आहे.

- Advertisement -

ठाकूर म्हणाले की, भारताचा जागतिक उदय आणि त्याचे आर्थिक सत्ता पचवता येत नसल्यामुळे जुनी जागतिक मीडिया हाऊसेस भारताविरुद्ध पद्धतशीर मोहीम राबवत आहेत. न्यूयॉर्क टाइम्सने सांगितलेले तथ्य खोटे आणि साफ चुकीचे असून भारतविरोधी खो्या अफवा पसरवण्यासाठी आणि तथ्यांचा विपर्यास करण्यासाठी युनेस्कोच्या व्यासपीठाचा गैरवापर केला आहे.

- Advertisement -

न्यूयॉर्क टाईम्सचे ए.जी. सुल्झबर्गर न्यूजरूम्सवरील तथाकथित छाप्यांचा उल्लेख करतात. मात्र भारतात कोणी काही चुकीचे केले तर, न्यूजरूम नाही तर भारतीय कायदा त्यांच्यावर कारवाई करतो. केवळ न्यूजरूमच्या स्थितीचा दावा केल्याने बेकायदेशीर कृत्यांपासून मुक्तता मिळत नाही. कुठलाही तपास, पुरावा असला तरी पत्रकारांवर हल्ला कसा होतो? भारतातील पत्रकारांना दहशतवादी म्हणून वागणूक दिली जाते, असे तोंड मोकळे करून घेणे शहाणपणाचे आहे का? असे प्रश्न ठाकूर यांनी उपस्थित केले आहे. त्यामुळे माझ्यासाठी, न्यूयॉर्क टाईम्स किंवा न्यू डिस्टॉर्ट टाइम्स हे वेगळे करणे कठीण झाले आहे, असेही अनुराग ठाकूर म्हणाले.

 

 

- Advertisment -