घरदेश-विदेशUN च्या विकास करणाऱ्या देशाच्या क्रमवारीत भारताची घसरण, भूतान-नेपाळने टाकलं मागे

UN च्या विकास करणाऱ्या देशाच्या क्रमवारीत भारताची घसरण, भूतान-नेपाळने टाकलं मागे

Subscribe

कोरोना संकटात भारताला आणखी एक धक्का बसला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या (यूएन) सदस्य देशांनी स्वीकारलेल्या १७ सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स (टिकाव विकास लक्ष्य – एसडीजी) मध्ये भारताने खराब कामगिरी केली आहे. याचा फटका कर्मवरीबर बसला असून नव्या क्रमवारीत भारताची २ स्थानांनी घसरण झाली आहे. भारत आता ११७ व्या स्थानावर घसरला आहे.

२०१५ मध्ये जाहीर झालेल्या नवीन अहवालानुसार, संयुक्त राष्ट्राच्या १९३ सदस्य देशांनी अवलंबिलेली १७ टिकाव विकास लक्ष्य (एसडीजी) मध्ये भारताच्या मागील कामगिरीमध्ये सुधारणा होऊ शकली नाही आणि आता भारत ११७ व्या स्थानावर फेकला गेला आहे. तर मागील वर्षी भारत ११५ व्या क्रमांकावर होता. यूएन सदस्य देशांनी २०१५ मध्ये १७ एसडीजी स्वीकारले होते. २०३० पर्यंत ही उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी अजेंडा निश्चित करण्यात आला होता.

- Advertisement -

भारताच्या पर्यावरण विषयक २०२१ च्या अहवालात असे दिसून येते की मागील वर्षी भारत ११५ व्या स्थानावर होता. उपासमार निर्मूलन आणि अन्न सुरक्षा (एसडीजी २), लिंग समानता (एसडीजी ५) आणि लहरी पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि देशात टिकाऊ औद्योगिकीकरण आणि नाविन्य (एसडीजी 9) ला प्रोत्साहन देणे, यामध्ये भारताला अपयश आलं आहे.

झारखंड आणि बिहारमधील परिस्थिती अत्यंत वाईट

दक्षिण आशियाई देशांपैकी भूतान, नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश या देशांच्या पण भारत खाली आहे. भारताची एकूण एसडीजी स्कोअर १०० पैकी ६१.९ आहे. देशातील राज्यांच्या सज्जतेचा अहवालही तयार करण्यात आला आहे. या अहवालात झारखंड आणि बिहारची स्थिती अत्यंत खराब असल्याचं म्हटलं आहे. झारखंड ५ एसडीजीमध्ये तर बिहार ७ मध्ये मागे आहे.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -