घरदेश-विदेशIndia Economy : देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत अर्थ मंत्रालायाने व्यक्त केला मोठा दावा, वाचा...

India Economy : देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत अर्थ मंत्रालायाने व्यक्त केला मोठा दावा, वाचा सविस्तर

Subscribe

नवी दिल्ली : 2047 पर्यंत भारत हा ‘विकसित देश’ बनावा, असे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. त्यासाठी भारत सरकारकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. गुरुवारी 1 फेब्रुवारीला केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून देशाच्या अर्थव्यवस्थेबाबतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार, 2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ही 7 ट्रिलियन डॉलर्स इतकी होऊ शकते, असा मोठा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर पुढील तीन वर्षामध्ये भारताची अर्थव्यवस्था ही 5 ट्रिलियन डॉलर्सचा स्तरही ओलांडू शकते. (India Economy: Finance Ministry has made a big claim about the country’s economy)

हेही वाचा… Germany : जर्मनीत चार दिवसांचा आठवडा; येत्या 1 फेब्रुवारीपासून लागू होणार

- Advertisement -

दरवर्षी 1 फेब्रुवारीला भारताचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून सादर करण्यात येतो. परंतु, या वर्षी अर्थ मंत्रालयाने पुनरावलोकन म्हणून ‘द इंडियन इकॉनॉमी: अ रिव्ह्यू’ नावाचा एक अहवाल तयार करून तो प्रसिद्ध केला आहे. या अहवालाची माहिती ही वित्त मंत्रालयातील मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांच्याकडून देण्यात आली आहे. या अहवालाबाबत व्ही. अनंत नागेश्वरन म्हणाले की, हा अहवाल आर्थिक सर्वेक्षणाची जागा घेत नाही. देशातील सार्वत्रिक निवडणुकीनंतर पूर्ण अर्थसंकल्पापूर्वी सर्वेक्षण होईल. मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर आर्थिक सुधारणांमध्ये सातत्य असल्याचे अहवालात सूचित केले आहे. मोदी सरकारच्या दोन टर्मचा लेखाजोखा देताना, हा 10 वर्षांचा प्रवास उत्तम भविष्य दर्शवतो.

तर, भारत आता 3.7 ट्रिलियन डॉलर (अंदाजे FY24) सह जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. परंतु, या अहवालानुसार, देशात कोरोनाचे संकट असुनही अर्थव्यवस्था मजबूत झाली. देशांतर्गत मागणी, खासगी उपभोग आणि गुंतवणुकीत दिसून आलेली ताकद सरकारने गेल्या 10 वर्षांत राबविलेल्या सुधारणा आणि उपाययोजनांमुळे शक्य झाली आहे. सरकारी धोरणांमुळे उत्पादनाला चालना देण्यासाठी भौतिक आणि डिजिटल इन्फ्रा गुंतवणुकीसह पुरवठ्याची बाजू मजबूत झाली आहे. अशा परिस्थितीत, आर्थिक वर्ष 25 मध्ये नाममात्र GDP 7% च्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. 5 जानेवारी रोजी सरकारने आर्थिक वर्ष 2024 मध्ये GDP 7.3% राहण्याचा अंदाज वर्तवला होता. 2030 पर्यंत विकास दर 7 टक्क्यांहून अधिक होण्यास भरपूर वाव आहे, अशी माहिती देखील अहवालाच्या माध्यमातून समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -