Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशCancer : कॅन्सर ठरतोय देशासाठी घटक, भारतात 5 पैकी 3 जणांचा होतोय मृत्यू

Cancer : कॅन्सर ठरतोय देशासाठी घटक, भारतात 5 पैकी 3 जणांचा होतोय मृत्यू

Subscribe

नवी दिल्ली : भारतामध्ये आरोग्यासंदर्भात अनेक उपाययोजना असूनही देशाला कॅन्सर (कर्करोग) या जीवघेण्या आजाराचा मोठा धोका आहे. नुकतेच समोर आलेल्या माहितीनुसार, कर्करोगाच्या मृत्यूंमध्ये भारत चीन आणि अमेरिकेनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशात 5 पैकी 3 कर्करोगाने पीडित रुग्णांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जागतिक कर्करोगाच्या आकडेवारीच्या विश्लेषणानुसार, देशातील दर पाचपैकी तीन जणांचा कर्करोगाचे निदान झाल्यानंतर मृत्यू होतो. तसेच, त्याचा पुरुषांपेक्षा महिलांवर अधिक परिणाम होतो. (India Faces High Cancer Mortality Rate 3 out of 5 Die After Diagnosis)

हेही वाचा : Swargate Rape Case : महिला प्रवाशांच्या सुरक्षेत हयगय करणाऱ्यांचे निलंबन करा, परिवहन मंत्र्यांचे निर्देश 

‘द लॅन्सेट’ हा इंग्रजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, अमेरिकेमध्ये कर्करोगाच्या रुग्णांचे आणि मृत्यूचे प्रमाण 4 पैकी 1 असल्याचे आढळून आले. तर चीनमध्ये हे प्रमाण 2 पैकी 1 होते. जगभरातील मुलांमध्ये कर्करोग वेगाने पसरत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या एका अभ्यासात असे आढळून आले की कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये भारत देश हा चीन आणि अमेरिकेनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच जगातील कर्करोगाच्या 10 टक्क्यांहून अधिक मृत्यूंसाठी जबाबदार आहे. संशोधकांनी सांगितले की, पुढच्या 20 वर्षांमध्ये भारतात कर्करोगाच्या मृत्यूची संख्या वाढू शकते. कारण लोकांचे वय वाढत असताना रुग्णांची संख्या दरवर्षी 2 टक्क्यांनी वाढत आहे.

संबंधित अभ्यासातून समोर आले की, देशातील पाच सर्वात सामान्य प्रकारचे कर्करोग, जे पुरुष आणि महिला दोघांनाही प्रभावित करतात, ते एकूण कर्करोगाच्या 44 टक्के प्रकरणांसाठी जबाबदार आहेत. संशोधकांच्या पथकाने गेल्या 20 वर्षांमध्ये देशातील वेगवेगळ्या वयोगटातील लोकांमध्ये 36 प्रकारच्या कर्करोगांचा अभ्यास केला. यासाठी त्यांनी ग्लोबल कॅन्सर ऑब्झर्व्हेटरी (ग्लोबोकॅन) 2022 आणि ग्लोबल हेल्थ ऑब्झर्व्हेटरी (GHO) द्वारे जारी केलेल्या डेटाचा वापर केला. तसेच, अहवालामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, देशात

भारतीय महिलांवर अधिक वाईट परिणाम अहवालानुसार, भारतात स्तनाच्या कर्करोगाच्या वाढत्या घटनांमुळे महिलांना कर्करोगाचा जास्त त्रास होत आहे. महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग सुमारे 30 टक्के नवीन प्रकरणांसाठी तसेच संबंधित मृत्यूंपैकी 24 टक्क्यांहून अधिक जबाबदार आहेत. त्यानंतर येतो सर्विकल कॅन्सर, जो 19 टक्क्यांहून अधिक नवीन प्रकरणांसाठी आणि सुमारे 20 टक्के मृत्यूंसाठी जबाबदार ठरतो. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) ने असा अंदाज वर्तविला आहे की, 2050 पर्यंत भारतात स्तनाच्या कर्करोगाच्या नवीन प्रकरणांमध्ये 170 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, मृत्यूंमध्ये 200 टक्के वाढ होणार आहे.