घरCORONA UPDATECovid-19 Vaccination: लसीकरण मोहिमेत जगात इंडिया भारी; ९५ दिवसात दिले १३ कोटी...

Covid-19 Vaccination: लसीकरण मोहिमेत जगात इंडिया भारी; ९५ दिवसात दिले १३ कोटी डोस

Subscribe

देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. आता लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना खुल्या बाजारात देखील लस विक्री करण्यास मुभा दिली आहे. तसेच १ मेपासून कोरोना लसीकरणच्या मोहीमेचा तिसरा टप्पा सुरू होत असून यामध्ये १८ वर्षांवरील व्यक्तींना लस घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता लसीकरणाचा आणखीच वेग वाढणार आहे. दरम्यान जगातील कोरोनी लसीकरणाच्या मोहीमेत भारत अग्रेसर असून मोठ्या प्रमाणात लसीकरण होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात ९५ दिवसांत १३ कोटी लसीकरण पार पडले आहे. हेच अमेरिकेत १०१ दिवसांत तर चीन १०९ दिवसांमध्ये १३ कोटी लोकांचे लसीकरण झाले होते.

आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात २ कोटी ९५ लाख ४२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २ हजार २३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १ लाख ६७ हजार ४५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ५६ लाख १६ हजार १३०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ८२ हजार ५३३ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी ३२ लाख ७६ हजार ३९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या २१ लाख ५७ हजार ५३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

आतापर्यंत १३ कोटी १ लाख १९ हजार ३१० जणांचे कोरोना लसीकरण पार पडले आहे. यामध्ये आतापर्यंत ९२ लाख १ हजार ७२८ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला लसीचा डोस घेतला आहे. तर ५८ लाख १७ हजार २६२ आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. तसेच १ कोटी १५ लाख ६२ हजार ५३५ फ्रंटलाईन वर्कर्सनी पहिला डोस घेतला असून ५८ लाख ५५ हजार ८२१ फ्रंटलाईन वर्कर्सनी दुसरा डोस घेतला आहे. शिवाय ६० वर्षांवरील ४ कोटी ७३ लाख ५५ हजार ९४२ जणांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला असून दुसरा डोस ५३ लाख ४ हजार ६७९ जणांनी घेतला आहे. तर ४६-६० वयोगटातील ४ कोटी ३५ लाख २५ हजार ६८७ लोकांनी पहिला डोस घेतला असून १४ लाख ९५ हजार ६५६ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.


हेही वाचा – COVID-19 vaccine: कोविशिल्ड लसीचे ठरले दर; सरकारी रुग्णालयात प्रति डोस ४०० रुपये, तर खासगी रुग्णालयात ६०० रुपये

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -