घरदेश-विदेशभारत करणार मसूद अजहरच्या भावावर बंदीची मागणी

भारत करणार मसूद अजहरच्या भावावर बंदीची मागणी

Subscribe

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला आंतराष्ट्र्रीय दहशतवादी ठरवण्याच्या मागणीनंतर त्याच्या भावावरही बंदी आणण्याची मागणी भारत करणार आहे. भारत यूएनमध्ये यबद्दल लवकरच प्रस्ताव ठेवणार आहे.

भारतातील अनेक हल्ल्यांचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटेचा म्होरक्या मसूद अजहरला यूएनमध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठवण्याची मागणी भारताकडून केली जात होती. यानंतर आता त्याचा भाऊ असगर आणि जैश-ए-मोहम्मदच्या इतर कमांडरबद्दलही भारताने हीच करणार आहे. ही मागणी भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांकडून केली जाणार आहे. जैश-ए-मोहम्मदवर बंदी घालण्याचा प्रस्ताव फ्रान्सने संयुक्त राष्ट्रांसमोर ठेवला होता. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्ताला एकट पाडण्याचा प्रयत्न भारताकडून केला जात आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचा इतर देशांकडून निषेध करण्यात आला असून यामध्ये अमेरिकाही सहभागी आहे.  मसूर अजहरवर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्ताव दुसऱ्यांदा यूएनमध्ये ठेवण्यात आला. या अधिही अमेरिकेने २०१७ मध्ये पाकमधील दहशतवादी संघटानांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. मात्र चीनने मध्यस्थी करून ही मागणी न स्विकारण्यास यूएनवर दबाव टाकला होता.

चेतवणारे भाषण

मसूद अजहर सध्या पाकिस्तानात आहे. आपल्या भाषणामध्ये अनेकदा मसूद भारता विरोधी वक्तव्य करतो. त्याच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानात भारता विरोधी वातावरण तयार झाले आहेत. पाकिस्तानबरोबरच काश्मीरमधील तरुणांना भडकवण्याचे कामही मसूद करत असल्याची माहिती समोर आली आहे. काश्मीरमधील तरुणांना भडकून हल्ले केले जात असल्याची माहीत यूएन समोर ठेवलेल्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -