घरदेश-विदेशभारत कोरोनाची लस शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार - पंतप्रधान

भारत कोरोनाची लस शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार – पंतप्रधान

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज यूकेमध्ये आयोजित ‘इंडिया ग्लोबल वीक २०२०’ चं व्हर्च्युअलपणे उद्घाटन केलं. या वेळी भाषण करताना कोरोना लस विकसित करण्यात भारत महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असं पंतप्रधान म्हणाले. “मला आशा आहे की कोरोना लस मिळाल्यानंतर त्याचं उत्पादन आणि विकासात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका असेल,” असं मोदी म्हणाले. आज आमच्या कंपन्या कोरोना लसीच्या विकास आणि उत्पादनासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नात सक्रिय आहेत, असंही मोदी म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, साथीच्या रोगाने पुन्हा एकदा हे दाखवून दिले आहे की, देशातील फार्मा उद्योग हा फक्त भारतासाठीच नाही तर जगासाठी महत्त्वाचा ठरतो आहे. विशेषत: विकसनशील देशांसाठी औषधाची किंमत कमी करण्यात प्रमुख भूमिका आहे. इतिहास दर्शवितो की भारताने सामाजिक किंवा आर्थिक आव्हानांवर विजय मिळविला आहे. यावेळी पंतप्रधान मोदी असेही म्हणाले की भारत कोरोनाच्या विरोधात जोरदार लढा देत आहे. देशाच्या अर्थकारणावर लक्ष केंद्रित करत आहोत. जगातील सर्वात खुली अर्थव्यवस्था म्हणून भारत एक आहे. आम्ही जगभरातल्या गुंतवणूकदारांचं भारतात स्वागत करतो.

- Advertisement -

आपला देश जेव्हा एखाद्या संकटातून उभारी घेण्याची गोष्ट करतो आहे त्याचा अर्थ ही उभारी देशाच्या आरोग्याला आणि त्यासोबत अर्थव्यवस्थेलाही मिळणारी आहे. अशक्यही शक्य करुन दाखवायचं ही भारतीयांची प्रेरणा आहे. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचा ग्रीन सिग्नल भारतीयांकडून मिळू लागला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारत एक प्रतिभेचा पॉवरहाऊस आहे. भारत हा योगदान देण्यात आणि संकटांशी लढायला शिकवण्यात नेहमीच तत्पर असतो. भारताने प्रत्येक आव्हान पेललेलं आहे हे इतिहासाने दाखवून दिलं आहे. मग ते आव्हान सामाजिक असो किंवा मग आर्थिक. डॉक्टर्स असोत, आयटी प्रोफेशनल असोत किंवा इतर क्षेत्रे असोत, भारताने नेहमीच चांगली कामगिरी करून दाखवल्याचं पंतप्रधान म्हणाले. संकटाच्या काळात पुनरुत्थानाची चर्चा करणं स्वाभाविक आहे. जागतिक पुनरुत्थान आणि त्याच्याशी भारताला जोडणं हे देखील स्वाभाविक आहे. जागतिक पुनरुत्थानाच्या प्रक्रियेत देखील भारत महत्त्वाची भूमिका पार पाडेल असा मला पूर्ण विश्वास आहे, असे पंतप्रधानांनी म्हटलं. गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत भारताने जीएसटीसह एकूण वित्तीय समावेशन, हाउसिंग आणि पायाभूत सुविधा, इज ऑफ डूइंग बिझनेस, बोल्ड टॅक्स सुधारणा अशा क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी केली आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -