भारतात कोरोनामुळे 47 लाख मृत्यू झाल्याचा WHO चा दावा; पण सरकारी आकडेवारी वेगळीच

50 lakh a india health expert raised question on who report on covid 19 related death in india covid 19 death in all over world in last two years
भारतात कोरोनामुळे 47 लाख मृत्यू झाल्याचा WHO चा दावा; पण सरकारी आकडेवारी वेगळीच लाख मृत्यू

देशात गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीने थैमान घातले. यात अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला. दरम्यान जानेवारी 2020 ते डिसेंबर 2021 दरम्यान भारतात कोरोनामुळे तब्बल 47 लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिला आहे. मात्र WHO ने दिलेल्या कोरोना मृतांची आकडेवारी आणि भारतीय सरकारच्या आकडेवारीत मोठी तफावत असल्याचे दिसत आहे. डिसेंबर 2021 पर्यंत भारतात सुमारे 47 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र हा आकडा भारतातील मूळ आकडेवारीपेक्षा 10 पटीने जास्त आहे. त्यामुळे जगातील कोरोना मृतांच्या एकूण आकडेवारीतील एक तृतीयांश मृत्यू हा एकट्या भारतात झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

दरम्यान देशातील आरोग्य तज्ज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोना मृत्यूंचा अंदाज लावण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मॉडेलिंग पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर तज्ज्ञांनी म्हटले की, WHO ने प्रत्येसाठी समान धोरण स्वीकारले आहे, हे योग्य नाही.

दरम्यान आयसीएमआर म्हणजे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक (आयसीएमआर) बलराम भार्गव, नीति आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल आणि एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया आरोग्य तज्ज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केली कोरोना मृतांचा अहवाल फेटाळून लावला आहे. त्यांनी म्हटले की, भारताने जागतिक पातळीवर योग्य प्रकारे कोरोनाची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे WHO ने जाहीर केली आकडेवारी संशयास्पद आणि वास्तवापासून भरकटलेली वाटत असल्याचे भारताच्या वतीने स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे WHO ने जारी केलेल्या आकडेवारीशी भारत सहमत नाही.

दरम्यान नीति आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल म्हणाले की, ‘भारतात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूसंदर्भातील योग्य आकडेवारी उपलब्ध असताना केवळ मॉडेलिंगच्या अंदाजावर आकडेवारी जाहिर करणे हे चुकीचं आहे. दुर्दैवाने आम्ही वारंवार पत्रव्यवहार आणि मंत्र्यांच्या बैठकीनंतरही WHO ने मॉडेलिंगवर आधारित आकडेवारीचा पर्याय निवडला.


raj thackeray ayodhya visit : चलो अयोध्या! राज ठाकरेंच्या दौऱ्याची जय्यत तयारी, मनसेचं शिष्टमंडळ अयोध्येत