देशातील बाधितांचा आकडा ६० लाखांच्या उंबरठ्यावर, ९४ हजारांहून अधिक कोरोनाचे बळी!

India's COVID19 related deaths cross 1 lakh mark with 1,069 deaths reported in the last 24 hours.

देशात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्यामुळे सध्या कोरोना चाचणीवर अधिक भर दिला जात आहे. म्हणूनच देशातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढता दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात ८८ हजार ६०० नवे रुग्ण आढळले असून १ हजार १२४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ५९ लाख ९२ हजार ५३३वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ९४ हजार ५०३ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत.

देशात सध्या ९ लाख ५६ हजार ४०२ रुग्णांवर उपचार सुरू आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे तसेच आतापर्यंत ४९ लाख ४१ हजार ६२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

देशात २६ सप्टेंबर पर्यंत ७ कोटी १२ लाख ५७ हजार ८३६ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहे. यापैकी शनिवारी दिवसभरात ९ लाख ८७ हजार ८६१ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR)ने दिली आहे.

 

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ३ कोटी ३० लाखांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत ९ लाख ९८ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी ४४ लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – Corona Update : राज्यात आज २३ हजार ६४४ रुग्ण बरे झाले, रिकव्हरी रेट ७६.९४%!