घरCORONA UPDATECoronavirus Rapid Test Kit: भारताने अखेर 'चायना माल' नाकारला

Coronavirus Rapid Test Kit: भारताने अखेर ‘चायना माल’ नाकारला

Subscribe

आरोग्य मंत्रालयाने चीनकडून येणाऱ्या कोरोना अँटीबॉडिज टेस्ट किट्सची ऑर्डर रद्द केली आहे. किट्सचा दर्जा चागंला नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ही ऑर्डर रद्द करत असताना आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, भारताला एकही पैसा वाया जाऊ द्यायचा नाही. सोमवारी ICMR कडून सर्व राज्यांना हे रॅपिड टेस्ट वापरू नये, असे आदेश दिले होते. दोन चायनीज कंपन्यांकडून हे किट मागविण्यात आले होते.

सोमवारी संध्याकाळी ICMR कडून एक पत्रक काढण्यात आले आहे. ज्यामध्ये ही ऑर्डर का रद्द करण्यात आली त्याची कारणीमीमांसा स्पष्ट केली आहे. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी तपासण्या हे अतिमहत्त्वाचे पाऊल आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी ICMR शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहे. यासाठी तपासणी किट्सची खरेदी आणि राज्यांना पुरवठा करणे गरजेचे आहे. त्याचवेळी, जागतिक स्तरावर या किट्ससाठीची मागणी प्रचंड वाढली असून सर्वच देश ती मिळविण्यासाठी आपली सर्व आर्थिक ताकद आणि मुत्सद्देगिरी पणाला लावून प्रयत्न करीत आहेत.

- Advertisement -

“ICMR ने या किट्सची मागणी पहिल्यांदा केली तेव्हा पुरवठादारांकडून काहीही प्रतिसाद आला नाही. दुसऱ्या प्रयत्नाला मात्र पुरेशा प्रमाणात प्रतिसाद मिळाला. बायोमेडीमिकस आणि वोन्डफो या चीनच्या दोन कंपन्यांकडून किट्सची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंबंधी आवश्यक ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमाणन या दोन्हींकडे होते.

वोन्डफोसाठी, मूल्यमापन समितीकडे चार बोली आल्या आणि त्यात रु. १,२०४, रु. १,२००, रु. ८४४ आणि रु. ६०० अशा बोली लावण्यात आल्या होत्या. त्यानुसार रु. ६०० या किमतीला L – 1 मानण्यात आले. दरम्यान, ICMR ने ही किट्स चीनमधील वोन्डफो कंपनीतून CGI मार्फत थेट मिळविण्याचाही प्रयत्न केला.

- Advertisement -

मात्र, थेट खरेदीसाठी सांगण्यात आलेल्या किमतीत पुढील अडचणी होत्या –

फ्री ऑन बोर्ड (FOB) पद्धतीने ही किंमत सांगितलेली होती. म्हणजेच ठराविक पद्धतीने वाहतूक केल्यास वाहतूक खर्च न लागता विक्री किमतीतच किट्स मिळणार होती. मात्र, वाहतुकीतील अडचणींबाबत यात कोणतीही वचनबद्धता स्वीकारण्यात आलेली नव्हती.

कोणत्याही हमीशिवाय मात्र 100 टक्के थेट आगाऊ रक्कम मिळण्याच्या अटीवर ही किंमत सांगण्यात आलेली होती.
वेळेबाबत कोणत्याही वचनबध्दतांचा उल्लेख नव्हता.

अमेरिकी डॉलरमध्ये दर सांगण्यात आले होते, मात्र त्यात त्याच्या मूल्यातील चढ-उताराबद्दलचे कलम नव्हते.
त्यामुळे वोन्डफोच्या भारतासाठीच्या वितरकाशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला गेला. त्या वितरकाने FOB साठी आगाऊ रकमेच्या कलमाशिवाय सर्वसमावेशक अशी किंमत सांगितली.

ही किट्स खरेदी करण्यासाठी एका भारतीय संस्थेकडून झालेला हा पहिलाच प्रयत्न होता, व केवळ लिलावात बोलल्या गेलेल्या दरांचाच आधार यासाठी उपलब्ध होता, याची नोंद घेतली गेली पाहिजे.

काही प्रमाणात पुरवठा झाल्यानंतर ICMR ने पुन्हा एकदा या किट्सच्या गुणवत्तेच्या चाचण्या प्रत्यक्ष क्षेत्रीय परिस्थितीत घेतल्या. त्यांच्या कामगिरीचे वैज्ञानिक पद्धतीने मूल्यमापन करून वोन्डफोची आणि दुसरीही ऑर्डर (मागणी), गुणवत्तेच्या कारणावरून रद्द करण्यात आली आहे.

येथे आणखी एक मुद्दा अधोरेखित केला जात आहे, की ICMR ने या पुरवठयांसंबंधाने कोणतीही रक्कम दिलेली नव्हती. योग्य प्रक्रिया अनुसरून काम केल्याने (१०० टक्के आगाऊ रक्कम भरून खरेदी न केल्याने) भारत सरकारचा एकही रुपया वाया गेलेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -