घर देश-विदेश नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात भारत करतोय प्रगती; विदेशी मीडियांनी केले मोदींचे कौतुक

नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात भारत करतोय प्रगती; विदेशी मीडियांनी केले मोदींचे कौतुक

Subscribe

लेखात म्हटले आहे की, भारतात शक्यता आहेत, पण काही आव्हानेही आहेत.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांचे ब्रिटिश माध्यमांनी कौतूक केले आहे. ब्रिटीश वृत्तपत्र ‘द टेलिग्राफने’ लिहिले आहे की, पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात असलेल्या राजकीय स्थैर्यामुळे भारत कायदेशीर सुधारणा, मूलभूत कल्याणकारी योजनांमध्ये सुधारणा आणि पायाभूत सुविधांना चालना देण्यात यशस्वी ठरला आहे.(India is making progress under Narendra Modi; Foreign media made fun of Modi)

ब्रिटीश लेखक बेन राईट यांनी लिहलेल्या लेखात लिहिले आहे की, मोदींचे राजकारण वादात अडकले असूनही, भारत त्याच्या भौगोलिक फायदे आणि डिजिटल कौशल्यांच्या अफाट क्षमतेद्वारे पुढे जात आहे. लेखात म्हटले आहे की, भारतात शक्यता आहेत, पण काही आव्हानेही आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने मोठी उद्दिष्टे ठेवली आहेत आणि ती साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. याच लेखामध्ये चांद्रयान-3 च्या यशाचाही उल्लेख केला आहे.

सर्वात वेगाने वाढणारा अर्थव्यवस्था

- Advertisement -

एअर इंडियाच्या एअरबस आणि बोईंगला विक्रमी 470 विमानांच्या ऑर्डरचा संदर्भ देत, लेखात असे म्हटले आहे की, जगभरातील राजधान्यांमध्ये पंतप्रधान मोदींसाठी रेड कार्पेट अंथरले जात आहेत. IMF ने भाकीत केले आहे की 2023 पर्यंत आणि पुढील पाच वर्षांसाठी भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहणार आहे.

हेही वाचा : Sanatan Dharma : मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत उदयनिधींवर केली सडकून टीका

व्यापार, उद्योगावरही टाकला प्रकाश

- Advertisement -

याच भागामध्ये Apple चे बॉस टिम कुक यांच्या मुंबई आणि दिल्ली येथे वैयक्तिकरित्या पहिले दोन रिटेल आउटलेट उघडण्याच्या आणि Apple साठी iPhones बनवणार्‍या Foxcom या तैवानी कंपनीने कर्नाटकमध्ये 1 बिलियन फॅक्टरी स्थापन करण्याच्या योजनांचाही उल्लेख केला आहे. सोबतच अमेरिकन कंपनी मायक्रॉनची गुजरातमध्ये सेमी-कंडक्टर फॅक्टरी सुरू करण्याची घोषणा आणि आंतरराष्ट्रीय फर्म गोल्डमन सॅक्सने भारतात बोर्डाची बैठक घेणे यालाही भारताच्या वाढत्या सामर्थ्याशी जोडले गेले आहे.

हेही वाचा : वन नेशन – वन इलेक्शनवर राहुल गांधी प्रथमच बोलले; ‘भारत हा राज्यांचा संघ, त्यावर केंद्राचा हल्ला’

आयपीएलही जगातील दुसरी सर्वात मौल्यवान लीग

या अहवालात व्यवसायाव्यतिरिक्त इतर क्षेत्रात भारताच्या वाढत्या वर्चस्वावर प्रकाश टाकण्यात आला आहे. अमेरिकन फुटबॉल लीगनंतर इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही आता जगातील दुसरी सर्वात मौल्यवान क्रीडा लीग आहे असे लिहिले आहे.

- Advertisment -