घरदेश-विदेशकर्नाटकातील म्हैसूरजवळ भीषण अपघात; बस आणि इनोव्हा कारची धडक, 10 ठार

कर्नाटकातील म्हैसूरजवळ भीषण अपघात; बस आणि इनोव्हा कारची धडक, 10 ठार

Subscribe

कर्नाटकात कार-बसच्या धडकेत दोन मुलांसह दहा जणांचा मृत्यू झाला आहे हा भीषण अपघात म्हैसूरजवळील तनरसिंगपुरा येथे झाला. इनोव्हा कारमधील एक जण थोडक्यात बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

कर्नाटकात कार-बसच्या धडकेत दोन मुलांसह दहा जणांचा मृत्यू झाला आहे हा भीषण अपघात म्हैसूरजवळील तनरसिंगपुरा येथे झाला. इनोव्हा कारमधील एक जण थोडक्यात बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलीसांना अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. म्हैसूरच्या पोलीस अधीक्षक सीमा लाटकर यांनी सांगितले की, तिरुमाकुडलू-नरसीपूरजवळ एका खासगी बसने कारला धडक दिली, त्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे.(  India Karnataka Accident 10 people including two children dead in accident bus and car near mysuru  )

- Advertisement -

मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये देण्याची घोषणा

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. तिरुमाकुडलू-नरसीपुरा, म्हैसूरजवळील रस्ता अपघातातील जखमींना योग्य ते वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हैसूरमधील तिरुमाकुडलू-नरसीपुराजवळील रस्ता अपघाताबद्दल शोक व्यक्त केला.

पीएमओनेदेखील ट्विट करून माहिती दिली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हैसूरमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांसाठी पीएमएनआरएफकडून 2 लाख रुपयांची एक्स-ग्रेशिया जाहीर केली आहे. तसेच जखमींना 50,000 रुपये देण्यात येणार आहेत.

- Advertisement -

( हेही वाचा: Delhi Crime : अल्पवयीन तरूणीच्या हत्येने दिल्ली हादरली, आरोपीने केले 40 वार )

पीएम मोदींनी व्यक्त केले दु:ख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही म्हैसूरजवळ झालेल्या अपघातावर शोक व्यक्त केला असून आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. पीएम मोदींनी ट्विट केले की, कर्नाटकातील म्हैसूर येथे झालेल्या दुर्घटनेने खूप दु:ख झाले आहे. माझी प्रार्थना  त्या कुटुंबांसोबत आहे ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना. असं, ट्वीट मोदींनी केलं आहे.

सोमवारीच झारखंडमधील धनबाद जिल्ह्यात रेल्वे फाटकजवळ वीज पडून सहा जणांचा मृत्यू झाला होता. धनबाद आणि म्हैसूर अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -