Coronavirus India Update: देशात २४ तासांत नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित वाढ; एकूण रुग्णसंख्या ३ कोटी पार!

Entrepreneurs task force formed under the chairmanship of the Minister of Industry
उद्योगमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजकांचा कृतीदल गठीत

देशात गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. मात्र आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित वाढ झाली असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी पार झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत ५० हजार ८४८ नवे कोरोनाबाधित आढळले असून १ हजार ३५८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ६८ हजार ८१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आता देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ कोटी २८ हजार ७०९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख ९० हजार ६६० जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी ८९ लाख ९४ हजार ८५५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात ६ लाख ४३ हजार १९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशात ८२ दिवसांनंतर सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५६ टक्के झाले असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट २.६७ टक्के झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

देशात डेल्टा व्हेरियंट रुग्ण जास्त आढळत आहेत, मात्र आता डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण देखील आढळत आहेत. यामुळे देशातील चिंता आणखीन वाढताना दिसत आहे. आतापर्यंत देशात डेल्टा प्लसचे २२ रुग्ण आढळले आहेत. यापैकी १६ रुग्ण महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यात आढळले आहे. रत्नागिरी आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे १६ रुग्ण समोर आले आहेत. उर्वरित रुग्ण केरळ, मध्य प्रदेश, तामिळनाडू येथील आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालय सचिव राजेश भूषण यांनी दिली.


हेही वाचा – Vaccine: २ वर्षांवरील मुलांना ‘या’ महिन्यात मिळणार covaxin लस, AIIMSच्या डॉक्टरांची माहिती