घरदेश-विदेशहवामान बदलामुळे भारताला ६५ हजार कोटींचा फटका

हवामान बदलामुळे भारताला ६५ हजार कोटींचा फटका

Subscribe

जागतिक हवामान संस्थेच्या अहवालात धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. २०२० मध्ये हवामानातील बदलाचा भारताला ६५,३५२ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. हवामान बदलामुळे आलेले चक्रीवादळ, अतिवृष्टी, पूर, दुष्काळ यामुळे भारताचे इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

जागतिक हवामान संस्थेच्या अहवालानुसार भारताला २०२० मध्ये अंदाजे ८७ अब्ज डॉलर्सचा म्हणजेच सुमारे ६५,३५२ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. तर सर्वाधिक फटका हा चीनला सुमारे २३७ अब्ज डॉलर्सचा बसला आहे. जपानला ८३, दक्षिण कोरियाला २४, पाकिस्तानला १५ तर थायलंडला १२, बांगलादेशला ११ अब्ज डॉलर्सचा फटका बसला असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

जागतिक हवामान संस्थेच्या अहवालानुसार जागतिक पातळीवर झालेल्या हवामानातील बदलांचा सर्वात मोठा फटका हा चीन आणि भारताला बसला आहे. विविध स्वरूपाची चक्रीवादळ, अतिवृष्टी, यामुळे उद्भवलेली पूर परिस्थिती, याविरोधातील परिस्थिती म्हणजे दुष्काळ यामुळे जगात विशेषतः आशियाला २०२० मध्ये अक्षरशः झोडपून काढले. यामुळे पिकांचे तसेच मालमत्तेचे नुकसान झाले, अनेकांचे बळी गेले. भारताला मोठा फटका बसला.

२०२० वर्षासाठीचा जागतिक हवामानातील बदलांचा आढावा घेणारा अहवाल प्रकाशित केला आहे. यामध्ये जागतिक पातळीवर तापमानात झालेली वाढ, हरितगृह वायुंचे वाढलेले प्रमाण आणि यामुळे जगावर झालेले परिणाम याबाबत भाष्य केले आहे. यामध्ये आशियामध्ये झालेल्या घडामोडींचा विशेष उल्लेख केला आहे. जागतिक हवामानातील बदलामुळे नैसर्गिक आपत्तींचा सर्वाधिक फटका हा आशियातील देशांना बसल्याचे अहवालात नमूद केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -