घरCORONA UPDATECorona : फेब्रुवारी २०२१पर्यंत अर्ध्या भारताला कोरोना झालेला असेल, केंद्रीय समितीचा निष्कर्ष!

Corona : फेब्रुवारी २०२१पर्यंत अर्ध्या भारताला कोरोना झालेला असेल, केंद्रीय समितीचा निष्कर्ष!

Subscribe

जगभरात थैमान घालणारा कोरोना कधी जाणार? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. जगात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण अमेरिकेत असून त्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे कोरोनाबाधित भारतात आहेत. त्यामुळे भारतात देखील कोरोनापासून मुक्तता मिळण्याची प्रतिक्षा आहे. मात्र, केंद्र सरकारने कोरोनाच्या देशातील परिस्थितीविषयी निरीक्षणं मांडण्यासाठी नेमलेल्या समितीने काही गंभीर निष्कर्ष काढले आहेत. त्यानुसार पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यापर्यंत तब्बल अर्धा भारत म्हणजेच ५० टक्के भारतीय कोरोनाबाधित झाले असतील असं नमूद करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आजघडीला आकडेवारीच्या गणितानुसार तब्बल ३० टक्के भारतीय कोरोनाबाधित आहेत, असं देखील या समितीकडून नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे आता भारतीयांच्या चिंतेत अधिक भर पडणार आहे.

३०% भारतीय कोरोना बाधित!

याय समितीचे सदस्य असलेले मनिंद्र अगरवाल यांनी राऊटर्सशी बोलताना हे निष्कर्ष मांडले आहेत. ‘आमच्या गणितीय मॉड्युलनुसार आजघडीला भारतातल्या ३० टक्के नागरिकांना कोरोनाची बाधा झालेली आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत हा आकडा थेट ५० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. या आकडेवारीच्या अभ्यासासाठी आम्ही एक नवीन मॉडेल तयार केलं असून त्यानुसार कोरोनाची नोंद झालेले रुग्ण आणि नोंद न झालेले रुग्ण अशा दोन प्रकारांमध्ये रुग्णांची आकडेवारी तपासली जात आहे’, असं मनिंदर अगरवाल म्हणाले.

- Advertisement -

सेरोलॉजिकल सर्वे म्हणतो फक्त १४ टक्के!

दरम्यान, या समितीने वर्तवलेला ३० टक्क्यांचा अंदाज हा केंद्र सरकारच्या सेरोलॉजिकल सर्वेच्या दुपटीहून अधिक आहे. सेरोलॉजिकल सर्वेनुसार भारतात आजघडीला १४ टक्के नागरिक कोरोनाबाधित आहेत. मात्र, यावर बोलताना मनिंदर अगरवाल म्हणाले, ‘सेरोलॉजिकल सर्वेमध्ये भारताची अवाढव्य लोकसंख्या पाहाता योग्य पद्धतीने नमुने (Sampling) होणं कठीण आहे’. मात्र, यासोबतच समितीने गंभीर इशारा देखील दिला आहे. जर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले गेले नाहीत आणि योग्य ती काळजी घेतली गेली नाही, तर ही टक्केवारी अजून वाढू शकते, असं समितीकडून नमूद करण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -