Covid-19 Fourth Wave : भारतात कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता, IIT कानपूरच्या संशोधकांची माहिती

भारतात कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता असल्याची माहिती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूरच्या संशोधकांनी दिली आहे. कोरोनाची चौथी लाट जून महिन्यातील २३ तारखेपर्यंत येण्याची शक्यता आहे. कोविड-१९ च्याबाबतीत संशोधकांनी सांख्यिकीय मॉडेल्सच्या आधारे अंदाज लावला आहे. IIT कानपूरच्या गणित आणि सांख्यिकी विभागाचे साबरा प्रसाद राजेशभाई, सुभ्रा शंकर धर आणि शलभ यांच्या नेतृत्वाखालील अभ्यासात असे सुचवण्यात आले आहे की, चौथ्या लाटेची तीव्रता कोरोना विषाणूच्या नवीन संभाव्य स्वरूपावर आणि लसीकरणाच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे.

भारतात कोरोनाची चौथी लाट ९३६ दिवसांनी येईल. २२ जून २०२२ ते २३ ऑगस्ट २०२२ पर्यंत कोरोनाचा संसर्ग शिखरावर पोहोचेल आणि नंतर २४ ऑक्टोबर २०२२ पर्यंत खाली उतरेल. संशोधकांनी सांगितले की, संभाव्य पुनर्रचनेचा संपूर्ण मूल्यांकनावर परिणाम होण्याची शक्यता नेहमीच असते. हे परिणाम संसर्गजन्यतेवर आणि इतर विविध घटकांवर अवलंबून होऊ शकतात.

या तथ्यांव्यतिरिक्त लसीकरणाचा प्रभाव पहिला, दुसरा किंवा बूस्टर डोस संसर्ग आणि संसर्गाची पातळी चौथ्या लाटेशी संबंधित विविध समस्यांवर महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडेच असा इशारा दिला होता की, कोरोना विषाणूचे ओमिक्रॉन फॉर्म अंतिम स्वरूपाचे नसून पुढील स्वरूप अधिक संसर्गजन्य असू शकते.

भारतात कोरोनाचे आत्तापर्यंत ४ कोटी २९ लाख २४ हजार १३० रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी ५ लाख १३ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ४ कोटी २३ लाख रुग्ण कोरोनामुक्त होत घरी परते आहेत. देशातील कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या सुमारे १ लाख २ हजार ६०१ इतकी झाली आहे.


हेही वाचा : Virat Kohli Special: कोहली १०० व्या कसोटीत शतकांचा दुष्काळ संपवणार? श्रीलंकेविरुद्धचा रेकॉर्ड नेमका कसा?