घरदेश-विदेशINDIA Mega Rally: पीएम मोदींकडून निवडणुकीत मॅचफिक्सिंगचा प्रयत्न, राहुल गांधींचा रामलीला मैदानावरुन...

INDIA Mega Rally: पीएम मोदींकडून निवडणुकीत मॅचफिक्सिंगचा प्रयत्न, राहुल गांधींचा रामलीला मैदानावरुन हल्लाबोल

Subscribe

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आयपीएलचा हवाला देत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. मॅच फिक्सिंग करून सामने जिंकले जातात. राहुल गांधी म्हणाले की, आमच्यासमोर लोकसभा निवडणूक आहे. अंपायर मोदींनी निवडले आहे. आमच्या दोन खेळाडूंना अटक करून आत टाकण्यात आले आहे. नरेंद्र मोदी या निवडणुकीत मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. 400 जागांचा नारा भाजपाने दिला आहे. परंतु ईव्हीएम आणि मॅच फिक्सिंगशिवाय ते 180 चा टप्पाही पार करु शकणार नाहीत. (INDIA Mega Rally Narendra Modi tries to fix election match BJP will not go above 180 Congress Rahul Gandhi)

नवी दिल्लीतील रामलीला मैदानात इंडिया आघाडीची मेगा रॅली सुरू आहे. या रॅलीला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रतील सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसंच, बँक खाती गोठवली गेल्याच्या मुद्यावरही त्यांनी यावेळी लक्ष वेधलं. काँग्रेस पक्षाकडे पोस्टर लावायलाही पैसे नाहीत, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.

- Advertisement -

.. तर या देशाचा अंत होणार

मॅच फिक्सिंग करून भाजपने निवडणुका जिंकल्या आणि त्यांनी संविधान बदलले तर या देशाचा अंत होणार, असे राहुल गांधी म्हणाले. ही निवडणूक मतांसाठी नसून संविधानाच्या रक्षणाची निवडणूक असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस पक्षाची सर्व खाती बंद करण्यात आली आहेत. नेत्यांना धमक्या दिल्या जातात, सरकार पाडले जाते, नेत्यांना तुरुंगात टाकले जाते. हे मॅच फिक्सिंग नरेंद्र मोदीच करत आहेत असे नाही तर मॅच फिक्सिंग नरेंद्र मोदी आणि तीन-चार अब्जाधीश मिळून करत आहेत. हे सत्य आहे.

- Advertisement -

तुम्ही मीडियाला शांत करु शकता, पण या देशाचा आवाज दाबू शकत नाही

राहुल गांधी म्हणाले की, भाजप खासदाराने म्हटले आहे, आम्हाला चारशे पार जागा हव्या आहेत. कारण आम्हाला संविधान बदलायचे आहे. भाजपने हे उगाच म्हटलेले नाही. ते टेस्ट करुन पाहत आहेत, तुमची त्यावर काय प्रतिक्रिया आहे. या देशाचे संविधान संपले तर हा देश वाचणार नाही. भाजप संविधान संपवयाची भाषा हे करत आहेत, कारण त्यांना तुमच्याकडील साधन संपत्ती संपवायची आहे. भाजपची मॅचफिक्सिंग यशस्वी झाली तर संविधान नष्ट होईल. संविधान नष्ट झाले तर या देशाच्या ह्रदयावर घाव होईल, असंही गांधी यावेळी म्हणाले.

संविधान वाचवण्यासाठी निवडणूक

ही निवडणूक संविधान वाचवण्याची निवडणूक आहे. गरीब, सर्वसामान्य लोकांचे अधिकार वाचवण्याची ही निवडणूक आहे. या निवडणुकीत मॅचफिक्सिंग केली जात आहे. हे देशभरात दिसत आहे. इलेक्शन कमिशनची निवड ही नरेंद्र मोदींनी केली आहे. दोन मुख्यमंत्र्यांना ऐन निवडणुकीच्या आधी तुरुंगात टाकले आहे. ही कारवाई निवडणुकीच्या सहा महिने आधी किंवा नंतरही करु शकले असते. तसंच, काँग्रेसचे बँक अकाऊंट ऐन निवडणुकीच्या तोंडावर फ्रिज करण्यात आले. हेही ते सहा महिने आधी किंवा नंतरही करु शकले असते. परंतु ते आताच केलं कारण त्यामागे षडयंत्र आहे. निवडणूक आयोगावर, सुप्रीम कोर्टावर यांचा दबाव आहे. यांना मॅचफिक्सिंग करायची आहे, त्यामुळे असे निर्णय घेतले जात आहेत, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -