घरदेश-विदेशनेपाळ पोलिसांकडून पुन्हा एकदा सीमेवर गोळीबार, एक भारतीय जखमी

नेपाळ पोलिसांकडून पुन्हा एकदा सीमेवर गोळीबार, एक भारतीय जखमी

Subscribe

भारत-नेपाळ सीमा वादात नेपाळने गोळीबाराची केली आहे. नेपाळक पोलिसांडून पुन्हा एकदा भारत-नेपाळ सीमेवर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत एक भारतीय तरुण जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमी तरूणाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितले जात आहे.

बिहारमधील किशनगंज जिल्ह्यातील तेहरागच्छ येथील फतेहपूर येथील भारत-नेपाळ सीमेवर ही घटना घडली. शनिवारी रात्री नेपाळ पोलिसांनी तीन भारतीय नागरिकांवर गोळीबार केला. ज्यामध्ये एक तरुण जखमी झाला आहे. जखमी झालेल्या युवकाला उपचारासाठी तेरागच्छ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं, त्यानंतर अधिक चांगल्या उपचारासाठी त्याला रेफरल रुग्णालयात पाठवण्यात आलं.

- Advertisement -

जखमी तरूणाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. या तरुणावर पूर्णिया येथे उपचार सुरू आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी सांगितलं की, जखमी जितेंद्रकुमार सिंग (वय २५) आणि त्याचे दोन साथीदार अंकितकुमार सिंग आणि गुलशनकुमार सिंग हे भारत-नेपाळ सीमेवर माफी टोला आणि मल्ला टोला येथे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जनावरे शोधण्यासाठी गेले होते. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार जेव्हा ते खेड्याबाहेर शेताकडे निघाले तेव्हा तेथे नेपाळ सीमेवर तैनात नेपाळ पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. ज्यामध्ये जितेंद्रकुमार सिंग यांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत. नेपाळहून झालेल्या या गोळीबार घटनेत जखमी झालेल्या जितेंद्रकुमार सिंग याला त्याचे सहकारी आणि स्थानिक ग्रामस्थांनी घरी आणलं. या घटनेची माहिती स्थानिक पोलीस आणि फतेहपूरमधील एसएसबीच्या बारावी बटालियनला देण्यात आली आहे.

यापूर्वी गोळीबारही करण्यात आला

यापूर्वी नेपाळच्या बाजूने सीमेवर गोळीबार करण्यात आला आहे. यावर्षी जून महिन्यात नेपाळने गोळीबार केला होता. या गोळीबारात एक व्यक्ती ठार झाली, तर चार लोक जखमी झाले. बिहारमधील भारत-नेपाळ सीमेजवळील सीतामढीच्या सोनबरसा पोलीस स्टेशन परिसरातील पिपरा परसाईन पंचायतीच्या लालबंदी येथील जानकी नगर सीमेवर ही घटना घडली होती.

- Advertisement -

हेही वाचा – मग कोरोना नष्ट होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाला साकडं का घातलं?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -