Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश देशात कोरोनाचं थैमान सुरूच! गेल्या २४ तासात ३ लाख ४९ हजार नवे...

देशात कोरोनाचं थैमान सुरूच! गेल्या २४ तासात ३ लाख ४९ हजार नवे रुग्ण, २ हजारांहून अधिक बळी

Related Story

- Advertisement -

देशभरात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी संपूर्ण देशात वेगाने कोरोना लसीकरण केले जात आहे. तर दुसरीकडे दिवसेंदिवस देशात बाधितांचा आकजडा वेगाने वाढताना दिसतोय. देशात गेल्या २४ तासात ३ लाख ४९ हजार ६९१ नव्या बाधितांची नोंद करण्यात आली तर २ हजारांहून अधिकांचा कोरोनाने बळी गेल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत २ लाख १७ हजारांहून अधिकांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशभरात २४ तासांत तब्बल २ हजार ७६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे आत्तापर्यंत भारतात झालेल्या मृतांची संख्या १ लाख ९२ हजार ३११ इतकी झाली आहे. त्यासोबतच २४ तासांमध्ये सलग चौथ्या दिवशी भारतात ३ लाखांहून जास्त कोरोनाबाधित आढळल्याने परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

सातत्याने वाढणाऱ्या बाधितांच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. गेल्या २४ तासांत ३ लाख ३२ हजारांहून अधिक नवे रूग्ण आढळल्याने ही संख्या वाढून १ कोटी ६९ लाख ६० हजार १७२ इतकी झाली आहे तर आतापर्यंत कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या १ लाख ९२ हजारांवर पोहोचली आहे. यासह सध्या देशात २६ लाख ८२ हजार ७५१ जण संक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहे. तर दिलासादायक म्हणजे १ कोटी ४० लाख ८५ हजार ११० जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत १४ कोटी ९ लाख १६ हजार ४१७ जणांनी लस घेतली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात ६७,१६० कोरोनाचे नवे रुग्ण

- Advertisement -

महाराष्ट्रात कोरोनाचा धोका कायम असून शनिवारी ६७,१६० नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४२ लाख २८ हजार ८३६ झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ लाख ९४ हजार ४८० वर पोहोचली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,५४,६०,००८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४२,२८,८३६ (१६.६१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४१,८७,६७५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून २९,२४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -