घरदेश-विदेशकलम ३७० हटवण्यास एक वर्ष पूर्ण; काश्मिर खोऱ्यात अशांतता पसरवण्याच्या पाकच्या हालचाली

कलम ३७० हटवण्यास एक वर्ष पूर्ण; काश्मिर खोऱ्यात अशांतता पसरवण्याच्या पाकच्या हालचाली

Subscribe

जम्मू – काश्मिरमध्ये दहशतवादाच्या विरोधात सुरक्षारक्षकांचे अभियान सुरू असतानाच या दरम्यान खोऱ्यात कलम ३७० हटवण्याच्या केंद्राच्या निर्यणाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र अशातच पाकिस्तानच्या वतीने काश्मिर खोऱ्यात अशांतता पसरवण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे सीमेवर बहुतांश ठिकाणी पाकिस्तानेचे छुपे दहशतवादी या दिशेने येण्याच्या प्रयत्नात आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा हा प्रयत्न असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतू भारतीय सुरक्षारक्षकांनी त्यांचा मार्ग रोखून धरला आहे.

- Advertisement -

पाकिस्तानी सेनेने लागोपाठ सीमेवर गोळीबार करत भारतीय लष्कराचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. असे करत दहशतवाद्यांचा घुसखोरीसाठी मार्ग त्यांनी मोकळा केला. आता ५ ऑगस्टपर्यंत दहशतवाद्यांच्यावतीने या परिसरात चमचकीचा प्रयत्न केला जाणार आहे. जैश – ए – मोहम्मदचे ६ दहशतवादी केरण सेक्टरजवळ घुसखोरी करण्याच्या उद्देशाने फिरत होते. तर लष्कराचे पाच दहशतवादी केरणच्याच सेक्टरजवळून घुसखोरी करू शकतात. काश्मिरमधील तंगधार सेक्टरमध्ये सर्वाधिक घुसखोरीचे प्रकार घडले आहेत. तिथेही ६ दहशतवादी दबा धरून बसले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सीमेवर सुरू असलेल्या पाकिस्तानी लष्कराच्या कारवायांचे कारण हे कलम ३७० हटवण्याच्या एक वर्षपूर्ती आहे. तसेच १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य पाकिस्तान अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा –

Covid 19 : आतापर्यंतची सर्वात वाईट जागतिक आणीबाणी; WHO ने केली चिंता व्यक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -