घरक्रीडाआशिया चषक 2023 : जय शाहांच्या ट्वीटला पीसीबीचे प्रमुख नजम सेठींचं प्रत्युत्तर; म्हणाले...

आशिया चषक 2023 : जय शाहांच्या ट्वीटला पीसीबीचे प्रमुख नजम सेठींचं प्रत्युत्तर; म्हणाले…

Subscribe

आगामी आशिया चषक 2023वरून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे. नुकताच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आगामी आशिया चषक 2023मध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असल्याची माहिती दिली. जय शाह यांनी ट्वीट करत ही माहिती दिली होती. त्यानंतर आता याच ट्वीटवरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुख नजम सेठी यांनी जय शाह यांच्यावर टीका केली आहे.

आगामी आशिया चषक 2023वरून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे. नुकताच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आगामी आशिया चषक 2023मध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असल्याची माहिती दिली. जय शाह यांनी ट्वीट करत ही माहिती दिली होती. त्यानंतर आता याच ट्वीटवरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुख नजम सेठी यांनी जय शाह यांच्यावर टीका केली आहे. ‘आशिया कप २०२३ संदर्भात जे काही निर्णय घेतले जात आहेत ते एकतर्फी आहे’, असा आरोप नजम सेठी यांनी केला आहे. तसेच, ‘पाकिस्तान बोर्डाकडून किंवा इतरांकडून कोणताही सल्ला घेतला जात नाही’ असेही त्यांनी सांगितले.

“आशिया चषक 2023चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र, त्यांनी एकट्याने निर्णय घेतला. जेव्हा तुम्ही खूप काही करत असाल, तेव्हा तुम्ही पाकिस्तान सुपर लीग 2023चे वेळापत्रकही जाहीर करा”, अशा शब्दांत नजम सेठी यांनी ट्वीट करत जय शाह यांचा समाचार घेतला.

- Advertisement -

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नजम सेठी यांनी सांगितले की, “एकट्याने घेतलेल्या निर्णयावर मला राग किंवा आश्चर्य वाटत नाही. संपूर्ण परिषदेत कोणाशीही बोलणे झालेले नाही. अशा प्रकारे उद्या मीही प्रमुख झाल्यावर घरी बसून निर्णय घेईन. निदान फोन तरी करायला हवा होता. आशियाई क्रिकेट परिषदेच्या विकास मंडळाने हे निर्णय घेतले. या मंडळात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व नव्हते. याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कळवण्यातही नाही आले. माझ्या माहितीनुसार आम्हाला सांगण्यात आले नव्हते. आमच्यासाठी हा निर्णय अचानक आला. याआधीही जय शहा यांनी विधान केले होते, त्यावेळी माझ्याआधी हे पद भूषवणाऱ्या रमीज राजा यांनी त्यावर आक्षेप घेतला होता. गोष्ट अशी आहे की एकीकडे पाकिस्तानने भारतात येऊन वर्ल्ड कप खेळावा अशी तुमची इच्छा आहे. दुसरीकडे तुम्ही म्हणता की आम्ही पाकिस्तानात जाऊन आशिया चषक खेळणार नाही. उद्या चॅम्पियन्स ट्रॉफीही पाकिस्तानात होणार आहे, तेही खेळणार नाहीत का? तुमची तत्त्वे असतील, तर तुम्ही पाकिस्तानला भारतात खेळण्यासाठी बोलावणार नाही. मग आम्हीही तुम्हाला पाकिस्तानात या असे सांगणार नाही. क्रिकेटपासून राजकारण दूर ठेवा. बीसीसीआय हे स्वतंत्र मंडळ आहे. आम्ही स्वतंत्र नाही. आम्ही सरकारचा भाग आहोत. प्रत्येक गोष्टीला सरकारकडून मंजुरी घ्यावी लागते हे उघड आहे. बीसीसीआय खाजगी आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने व्हायला हवेत”.


हेही वाचा – IND vs SL t20 : श्रीलंकेचा भारतावर विजय; मालिकेत 1-1 अशी बरोबरी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -