घरताज्या घडामोडीOmicron Variant: ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी; सरकारचा मोठा निर्णय

Omicron Variant: ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी; सरकारचा मोठा निर्णय

Subscribe

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे (Omicron) शिथिल केलेले निर्बंध हळूहळू पुन्हा लागू होताना दिसत आहेत. आता ३१ जानेवारीपर्यंत सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर (International Flights) बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एविएशन (DGCA)ने माहिती दिली आहे. त्यामुळे परदेशात प्रवास करणाऱ्यांच्या पदारात पुन्हा एकदा निराशा पडली आहे.

गुरुवारी रात्री डीजीसीएने एक आदेश जारी करून ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी असल्याचे सांगितले. या आदेशात डीजीसीए म्हणाले की, सर्व शेड्यूल आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर (Sheduled International Flights) ३१ जानेवारी २०२२ पर्यंत बंदी कायम ठेवली आहे. पण हा आदेश ऑल-कार्गो फ्लाइट (All-Cargo Flight) आणि स्पेशल मंजूरी प्राप्त फ्लाइटसाठी नाही आहे. म्हणजेच या फ्लाइटवर बंदी घालण्यात आली नाही.

- Advertisement -

डीजीसीए म्हणाले की, कोरोना धोका पाहता २६ नोव्हेंबरला जारी केलेल्या आदेशात बदल केला गेला आहे. प्राधिकरणाने म्हटले की, केस ऑन केस बेसिसवर (Case on Case Basis) निवडलेल्या मार्गांसाठी अनुसूचित आंतरराष्ट्रीय उड्डाणे केली जाऊ शकतात. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियासोबत (AAI) सर्व एअरपोर्ट ऑपरेटरना पाठवलेल्या आदेशाचे पालन करण्यास सांगितले आहे.

दरम्यान १५ नोव्हेंबरला १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे नियमित सुरू होऊ शकतात असे समोर आले होते. परंतु त्यानंतर ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळला. त्या अनुषंगाने आता सरकारने ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे होणार नसल्याचे जाहीर केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – CDS Bipin Rawat आणि १३ जणांच्या मृतदेहांची ओळख कशी पटली ? भारतीय सेनेचा खुलासा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -