घरदेश-विदेशइम्रान खान यांचे देखील 'लाव रे तो व्हिडीओ'; भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे...

इम्रान खान यांचे देखील ‘लाव रे तो व्हिडीओ’; भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे कौतुक

Subscribe

इस्लामाबाद : एका मोठ्या जाहीर सभेत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा व्हिडीओ लावला आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाखाणणी केली. युक्रेन युद्ध सुरू असल्याने निर्बंध लादले जाण्याची भीती असतानाही रशियाकडून भारत तेल खरेदी करीत आहे आणि पण त्याचबरोबर पाश्चिमात्य देशांना प्रत्युत्तरही देत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले आहे.

- Advertisement -

अमेरिकेसह अन्य परदेशी राष्ट्रांच्या कटकारस्थानामुळे एप्रिल महिन्यात आपल्याला पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागले, असा ठपका इम्रान खान यांनी ठेवला आहे. पाश्चिमात्य देशांच्या भूमिकेला दाद न देता तसेच अमेरिकेशी धोरणात्मक संबंध असतानाही रशियाकडून तेल घेणे भारताने सुरूच ठेवल्याबद्दल त्यांनी यापूर्वी देखील भारताची प्रशंसा केली आहे आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर टीका केली आहे.

इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाने गेल्या आठवड्यात लाहोर येथे एका मोठ्या सभेचे आयोजन केले होते. त्यामध्ये जून महिन्यात ब्रातिस्लाव्हा येथे झालेल्या एका परिषदेतील परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केलेल्या भाषणाची व्हिडीओ क्लिप दाखवली. आपल्या जनतेसाठी जे काही सर्वोत्तम करता येईल, ते भारत करणारच, जयशंकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

जेव्हा भारतीय परराष्ट्र मंत्र्यांना सांगितले की, रशियाकडून तेल खरेदी करू नका. त्यावर जयशंकर यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, भारताच्या परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवू पाहणारे ते कोण आहेत? जनतेची गरज असल्याने युरोप रशियाकडून तेल खरेदी करते. आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणे सुरूच ठेवू, असेही परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले.

यावर इम्रान खान यांनी ‘याला म्हणतात स्वतंत्र देश’ अशा शब्दांत कौतुक केले आहे. तर, पाकिस्तानचे शाहबाज सरकार रशियाकडून तेल खरेदी करण्याबाबत अमेरिकेच्या दबावाखाली आहे, असे इम्रान खान म्हणाले.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -