घरदेश-विदेशसिझेरियन प्रसूती करत असाल तर सावधान!

सिझेरियन प्रसूती करत असाल तर सावधान!

Subscribe

खाजगी रुग्णालयात सिझेरियन प्रसूती करणाऱ्याचे प्रमाण वाढले आहे. गरज नसतानाही अशा पद्धतीने प्रसूती केली जाते असे अहवालातून समोर आले आहे.

भारतातील खाजगी रुग्णालयात प्रसुती करण्यासाठी गेलेल्या पालकांना जर सिझेरियनचा पर्याय देण्यात आला तर पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. देशातील खाजगी रुग्णालयात प्रसुतीची संख्या वाढली असल्याची माहिती समोर आली आहे. यामधील अनेक सिझेरियन गरज नसतानाही या पद्धतीचा वापर करण्यात आला. पैशांसाठी खाजगी रुग्णालयामध्ये सिझेरियन करण्याचे प्रमाण वाढले असल्याचे या अहवालात सांगितले आहे. अभिनेता अक्षय कुमार याचा चित्रपट “गब्बर”मध्ये दाखवल्या प्रमाणे दृष्य हे भारताच्या रुग्णालयांमध्ये दिसत आहे. नैसर्गिक पद्धतीने प्रसूती केल्यास रुग्णालयाला पैसे कमी मिळतात. मात्र सिझेरियन करण्याचा खर्च हा जास्त असतो.

काय म्हटलं आहे या अहवालात 

भारतात केवळ पैसे कमावण्यासाठी खाजगी रुग्णालयात महिलांची सिझेरियन प्रसूती असल्याची धक्कादायक बाब एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. अहवालत दिलेल्या आकडेवारीनुसार वर्षभरात ७० लाख महिलांची प्रसूती झाली असून यातील ९ लाख महिलांची गरज नसताना सिजोरियन प्रसूती करण्यात आल्याचे या अहवाल म्हणले आहे.

- Advertisement -

आयआयएम ए ने सादर केली आकडेवारी 

अहमदाबाद येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ (आयआयएम-ए) ने हा अहवाल सादर केला आहे. गरज नसतानाही या महिलांची प्रसूती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गरज नसताना माहिलांची सिझेरियन प्रसूकी केल्याने लोकांच्या खिशाला कात्री बसली आहे. तसेच वेळे अगोदर प्रसूती केल्याने अनेक बाळांना आईचे दूधही मिळाले नाही. त्यामुळे या बाळांची वाढ निट होऊ शकली नाही आणि श्वसनाच्या समस्या या बाळांमध्ये आढळून आल्या. बाळाची सुरक्षित प्रसूती व्हावी यासाठी महिला सरकारी रुग्णालयापैकी खाजगी रुग्णालयात जातात. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (एनएफएचएस) च्या २०१५-१६ च्या आकडेवारीनुसार खाजगी रुग्णालयात ४०.९ टक्के सिजेरियन प्रसूती तर सरकारी रुग्णालयात केवळ ११.९ टक्के सिजेरियन प्रसूती करण्यात आली आहे. सिजेरियन प्रसूतीचा खर्च सरासरी २० ते २५ हजार असतो मात्र नैसर्गिक प्रसूतीचा खर्च त्यातुलनेत कमी होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -