Tuesday, March 25, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशINDIA : विरोधकांच्या आघाडीची रविवारी दिल्लीत रॅली; केजरीवाल, सोरेन कारवाईचे मुद्दे केंद्रस्थानी

INDIA : विरोधकांच्या आघाडीची रविवारी दिल्लीत रॅली; केजरीवाल, सोरेन कारवाईचे मुद्दे केंद्रस्थानी

Subscribe

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियाने उद्या, रविवारी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर महारॅली आयोजित केली आहे. यात सर्व विरोधी पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत.

हेही वाचा – Devendra Fadnavis : महायुतीत अजूनही 4-5 जागांचा तिढा, फडणवीसांनीच केले मान्य

चार-पाच मुद्द्यांवर या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा मुद्दा केंद्रस्थानी आहे. यासोबतच झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावरील ईडी कारवाईचे प्रकरणही या रॅलीत उपस्थित करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दिली.

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना 31 जानेवारी रोजी सक्तवसुली संचालनालयाने (ED) जमीन घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात अटक केली होती. या पार्श्वभूमीवर आयोजित रॅलीत झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेनही उपस्थित राहणार आहेत. भाजपाने ज्या लोकांना लक्ष्य केले आहे त्यांना अजिबात विसरता येणार नाही, असे काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले.

हेही वाचा – Ambadas Danve : खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर दानवे संतापले, म्हणाले – मानहानीचा दावा करणार

देशातील लोकशाही आणि संविधान नष्ट करण्याच्या प्रयत्नात भाजपा आहे. त्यामुळे, विरोधकांच्या आघाडीतर्फे उद्या, रविवारी ‘लोकतंत्र बचाओ रॅली’ काढण्यात येणार असल्याचे दिल्ली काँग्रेसचे प्रभारी दीपक बाबरिया यांनी सांगितले. देशात शेतकरी आंदोलन करत आहेत, तरुण त्रस्त आहेत, पेपर लीक होत आहेत, बलात्कार पीडितेच्या आरोपींना संरक्षण दिले जाते, असे सांगून बाबरिया म्हणाले की, भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधी यांनी हे सर्व मुद्दे उपस्थित केले होते, तेव्हा विरोधी एकता मोडण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांना अटक करण्यात आली.

हेही वाचा – Thackeray group : …म्हणून न्यायाचा तराजू अस्थिर, ठाकरे गटाचा मोदी सरकारवर प्रहार